Sunday, 9 November 2025

ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन !

ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन !
          --- ठाणे महापालिका उपायुक्त जी.जी.गोदेपुरे यांनी दिले आश्वासन.

ठाणे दिनांक ८ नोव्हेंबर :
येत्या पंधरा दिवसांत सर्व विभाग प्रमुखांनी त्या विभागातील प्रलंबित प्रश्नांबाबत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश बैठकीत देत येत्या महिन्याभरात धोरणात्मक विषयांवर विधी सल्लागारांबरोबर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, व पुढील महिन्यात युनियन बरोबर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येतील, असे आश्वासन ठाणे महानगरपालिका उप आयुक्त (मुख्य) श्री जी.जी.गोदेपुरे यांनी आयुक्तांच्या वतीने श्रमिक जनता संघ युनियनच्या शिष्टमंडळाला शुक्रवारी दिले.
ठाणे महानगरपालिकेच्या विविध खात्यांचे कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी ७ नोव्हेंबर रोजी शेकडो कामगारांनी धरना प्रदर्शन केले होते. या वेळी झालेल्या चर्चेत ठाणे महानगरपालिकेत कायमस्वरूपी बारामाही सतत चालणारी अत्यावश्यक कामे करणारे सर्व कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामगारांच्या सारखे वेतन, भत्ते आणि कायदेशीर सोयी सुविधा लागू करा, अशी कंत्राटी कामगार कायद्यानी केलेली तरतूद दाखवत मागणी श्रमिक जनता संघ युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी बैठकीत केली. त्यावर विधी सल्लागार यांच्याबरोबर सल्लामसलत करून योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन उपायुक्त श्री गोदेपुरे यांनी दिले आहे. 

कामगारांचे वेतन एकवीस हजार झाले म्हणून राज्य कामगार विमा योजनांचा लाभ बंद केल्याने घाणीचे सानिध्यात काम करणाऱ्या सफाई कामगारांना व्यवसायामुळे होणारे आजारांसाठी उपचार सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी मागणी केली.त्यावर मागणी रास्त आहे, धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल, महिनाभरात या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

शिक्षण विभागाचे सफाई कामगारांच्या समस्यांबाबत शिक्षण विभागाचे उपायुक्त यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक बोलावून निर्णय होईल. सर्व खात्यांचे कंत्राटी कामगारांना दरमहा वेतन स्लिप देण्यात येईल, जे कंत्राटदार पालन करणार नाही त्यांचे विरूद्ध कारवाई करण्यात येईल. कामगारांची फसवणूक करणाऱ्या ठेकेदाराचे कंत्राट संपताना, कामगारांच्या थकीत देणी दिल्या शिवाय त्याची बिलं अदा करू नये, अशी मागणी युनियन तर्फे करण्यात आली. पांच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा देणाऱ्या कंत्राटी कामगारांना उपदानाची (Gratuity) रक्कम अदा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ती रक्कम एक खात्यात जमा करावी व वयोमानानुसार कामावरून कमी करताना किंवा कामगार मयत झाल्यास त्याचा सेवा काळाच्या अनुसार उपदानाची रक्कम अदा करण्यात यावी, अशी सूचना यावेळी युनियन तर्फे करण्यात आली.

या पूर्वी झालेल्या बैठकीचे निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शिष्टमंडळाने बैठकीत मांडली यावेळी शिष्टमंडळात युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया, चिटणीस सुनील दिवेकर, संघटक संतोष देशमुख, अर्चना पवार, स्वाती देशमुख, विमल खांडे, भास्कर शिगवण, भूषण शिंगे, सचिन दातिल आदी विविध खात्यांचे प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आंदोलनाला पाठिंबा देत समता विचार प्रसारक संस्थेच्या सचिव लतिका सुप्रभा मोतीराम, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाचे अजय भोसले यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले..

जगदीश खैरालिया,
सरचिटणीस -श्रमिक जनता संघ

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...