रिपाइचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांना अपशब्द वापरत धमकी दिल्याप्रकरणी पोलिस उपायुक्त यांना निवेदन !!
कल्याण, प्रतिनिधी : रिपाइंचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रल्हादजी जाधव यांना फोन करत एका अज्ञात महिलेने अपशब्द वापरले तसेच कुटुंबाला उद्देशून धमकी दिली. त्याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असताना अजून पर्यंत कोणतीही ठोस अशी कारवाई पोलिसांकडून करण्यात आलेली नाही.
यासंदर्भात रिपाइंचे हरीश कांबळे (ठाणे जिल्हा उपाध्यक्ष युवक आघाडी) यांनी काल दिनांक १७/११/२५ रोजी कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे सर यांना भेटून सदर महिला तत्काळ शोधून कठोर कारवाई करावी. अन्यथा रिपाई ठाणे जिल्हा ग्रामीण युवक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष तेजस जाधव, डोंबिवली शहर अध्यक्ष किशोर जी मगरे, आणि रिपाई चे सर्व कार्यकर्ते यांच्या सोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असे निवेदन दिले.
No comments:
Post a Comment