Thursday, 5 March 2026

सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांना ईगल फौंडेशनचा रणरागिणी पुरस्कार जाहीर !!

सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांना ईगल फौंडेशनचा रणरागिणी पुरस्कार जाहीर !!

महिला सक्षमीकरणासाठी विविध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन, महिलांना स्वावलंबी बनविण्याचा केलेला प्रयत्न, प्रभागातील गरजू महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केलेले मार्गदर्शन व पाठपुरावा, महिला सुरक्षा व जनजागृतीसाठी सभा, मळावे व मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन,सामाजिक उपक्रमात सक्रिय सह‌भाग, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे अभियान, विविध कार्यशाळा, स्वच्छता, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी  त्यांनी  कौतुकास्पद काम केले आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा माध्यमानून जिल्हा स्तराव महिलांना राजकीय व सामजिक क्षेत्रात सक्रिय सहभागास प्रेरित केले. विविध सामाजिक प्रश्नांवर प्रशासनाकडे निवेदन देऊन  सतत पाठपुरावा कुरून समस्या सोडविण्यास हातभार लावला. गरीब व वंचित घटकासाठी मदतकार्य केले. अन्नधान्य वाटप, शालेय साहित्य वितरण,महिला उद्‌योजकता वाढीसाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन व पक्षाची विचारधारा तळागाळात पोहोचविण्यास सातत्यपूर्ण प्रयल केला आहे. त्यांच्या या सामाजिक कामाची दखल घेवुन यावर्षीचा राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार  जाहीर करण्यात आला आहे.

 सौजन्य/वृत्त - विलासराव कोळेकर सर 

No comments:

Post a Comment

महेंद्रशेठ घरत यांचा साई मंदिर वहाळतर्फे सत्कार !!

महेंद्रशेठ घरत यांचा साई मंदिर वहाळतर्फे सत्कार !! उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) : आंतरराष्ट्रीय कामगार नेते  महेंद्रशेठ घरत हे आ...