Tuesday, 21 April 2026

द्रोणागिरीत भरतीच्या पाण्यामुळे शेतीला धोका ; मातीचा गाळ साचल्याने विविध समस्या निर्माण !!

द्रोणागिरीत भरतीच्या पाण्यामुळे शेतीला धोका ; मातीचा गाळ साचल्याने विविध समस्या निर्माण !!

उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) : नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिडकोने कोट्यवधी रुपये खर्चुन नवी मुंबईसह उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोडमध्ये समुद्राच्या भरतीचे पाणी साठवण्याचे नियोजन केले होते. यासाठी डच तंत्राचा वापर करीत सहा साठवण तलावाची निर्मिती केली. मात्र या तलावात मातीचा गाळ साचल्याने याचा मूळ उद्देश मागे पडला असून त्यावर आता खारफुटी उगवली आहे. त्यामुळे येथील शेतीत समुद्राच्या भरतीचे आणि पावसाचे पाणी जाऊन नागरिकांचे नुकसान होत आहे.त्यामुळे संबंधित विविध समस्या त्वरित सोडवाव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत.

पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी पावसाच्या पाण्याची साठवणूक करून साठवण तलावाची निर्मिती करण्याचा घाट प्रशासनाने घातला. मात्र या तलावांची देखभाल दुरुस्ती न केल्याने पावसाच्या पाण्याबरोबरच गाळाचा थर मोठ्या प्रमाणात यामध्ये साचला आहे. यामुळे पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली असून या तलावांच्या निर्मितीचा मूळ उद्देश मागे पडला. या भरावामुळे पावसाचे पाणी आजूबाजूच्या शेतीच्या वावरात शिरत असल्याने तलावाचा उपयोग कमी आणि नुकसान जास्त अशी परिस्थिती ओढावली आहे. विकासाच्या नावाने उरणमध्ये करण्यात आलेल्या या नियोजनाचा पुरता फज्जा उडाला आहे. गावामध्ये भर उन्हाळ्यात समुद्राच्या भरतीचे आणि साठवणूक केलेले पाणी शिरू लागले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या शेतीचे, घरांचे आणि  सामानाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.

अन्नधान्य, कपडे आणि विद्युत उपकरणांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.द्रोणागिरी नोडमधील सिडकोच्या साठवण तलावामुळे भरतीचे पाणी बोकडवीरा, नवघर, कुंडेगाव आदी गावात शिरले. घरांमध्ये हे पाणी शिरल्याने अन्नधान्य, कपडे आणि विद्युत उपकरणाचे नुकसान झाले आहे.सिडको, जेएनपीटी आणि खासगी विकासकांनी विकासकामांचा धडाका लावल्याने याचा मोठा फटका स्थानिकांना मोठया प्रमाणात बसला आहे.सिडकोने या भागात पाच साठवण तलाव बांधले आहेत. हे सर्व तलाव गाळाने भरल्याने पाणी ओसंडून वाहत आहे.समुद्राच्या भरतीचे पाणी येऊ नये व आलेले पाणी परत जाण्यासाठी लावण्यात आलेली झाकणे तुटल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी याचा कोणताही उपयोग होत नाही. उलट पाण्याचा निचरा करणारे नैसर्गिक नाले बुजवले गेल्याने शेतीचे नुकसान होत आहे.सिडकोच्या साठवणूक तलावामुळे परिसरात दुर्गंधीचे वाढली आहे. मोठ्या प्रमाणात खारफुटी वाढल्याने डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा आरोग्यावर परिणाम होत असून येथे विविध आजारांनी डोके वर काढले आहे.द्रोणागिरीतील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना आता विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

कोट (चौकट ):- 

किनारा नियमावली (सीआरझेड) च्या कक्षेत हे साठवण तलाव येत असल्याने तलावातील खारफुटी काढण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. काही प्रमाणात पाणी काढण्याचे नियोजन केले जाणार आहे. तर भरतीचे पाणी येऊ नये यासाठी नाल्यांना बसविण्यात आलेली झाकणे दुरुस्त करण्यात येणार आहेत. 
    - आर. पी. रोडे, अधीक्षक अभियंता, द्रोणागिरी नोड

No comments:

Post a Comment

काँग्रेस देशभर आंदोलन करून मोदी सरकारच्या वारंवार मांडणाऱ्या खोटारड्या भूमिकेची पोलखोल करणार !!

काँग्रेस देशभर आंदोलन करून मोदी सरकारच्या वारंवार मांडणाऱ्या खोटारड्या भूमिकेची पोलखोल करणार !! ** अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी स...