सरळगाव येथे प्राचार्य श्री. गोरख ओंकार माळी यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न !!
सरळगाव (ता. मुरबाड, जि. ठाणे) : ता. २५,
पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संचलित सरळगाव विभाग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे शाळेचे प्राचार्य श्री. गोरख ओंकार माळी यांच्या सेवापूर्तीनिमित्त भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय बी. डी. काळे सर, मा. आमदार गोटीराम पवार, आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे खजिनदार भोईर सर, उपाध्यक्ष श्रीराम भोईर, मा.के.बी घाटोळे सर, मा. सोन्या पाटील तसेच श्री.एन.एम भामरे, मा.बी.एन पाटील, मा.प्रशांत भामरे सर मा.दिपक पवार साहेब. मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्ष मा. मनिषा देसले मॅडम, शाळा समितीचे सदस्य मा.विष्णु पवार, मा.राजेश झुंजारराव इ.यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमास संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी, सरळगाव शाळेचे सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारमूर्ती श्री. गोरख माळी सर यांनी आपल्या दीर्घ सेवाकाळात प्रामाणिकपणा, शिस्त आणि विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम यामुळे शाळेची शैक्षणिक प्रगती साधली. त्यांच्या कार्याचा गौरव करताना मान्यवरांनी त्यांच्या योगदानाचे कौतुक केले व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना माळी सरांच्या कार्यशैलीचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची रंगत वाढवली. शेवटी सत्कार, स्मृतिचिन्ह व शाल-श्रीफळ देऊन माळी सरांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पार पडले. संपूर्ण कार्यक्रम भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.
सौजन्य- श्री विश्वनाथ राऊत सर
No comments:
Post a Comment