ग्रामपंचायत नोंदीत फेरफार प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश !!
कल्याण प्रतिनिधी – विशाल कुरकुटे
पंचायत समिती कल्याण यांच्या कार्यालयातून ग्रामपंचायत रायते, ता. कल्याण, जि. ठाणे येथील प्रकरणात महत्त्वाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनी ग्रामसभेतील ठरावांच्या अनुषंगाने बोपस व नमुने क्रमांक ८ व ९ क्षेत्रातील अतिक्रमण धारकांची नोंद व कर आकारणी करताना अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणात ग्रामपंचायत दप्तरी नोंद घेतलेल्या बाबींमध्ये फेरफार केल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले असून संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात श्री.राजू सोनवणे यांनी दिलेल्या अर्जांवर व पत्रव्यवहारावरून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य ती चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, नियमबाह्य कृत्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पंचायत समितीने स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment