Monday, 6 April 2026

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !!

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा  मोठ्या भक्ती भावाने साजरी !!

** ३३ तास चाललेल्या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेत हजारो भाविकांनी यात्रेचा आनंद लुटला

मुंबई (शांताराम गुडेकर) :
  
         महाराष्ट्राला तिर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभलेली आहे. या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत त्यापैकी जे. एन. पी. टी बंदर घारापुरी (एलिफंटा लेणी) यांच्यामधील न्हावा गावामधील मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे.

                    या गावामधील गावदेवीची यात्रा चैत्र कृष्ण पक्ष-१  दि.३ एप्रिल २०२६ पार पडला. तर  पालखी सोहळा दि.४ एप्रिल २०२६ रोजी मोठया थाटामाटात पार पडला.अनेक गावामधील ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेतले व हजारो भाविकांनी यात्रेचा आनंद लुटला .पालखी सोहळा यावर्षी ३३ तास चालला होता. ग्रामस्थांनी जत्रेची विशेष तयारी केली होती.तसेच हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी ग्रामसुधारक मंडळ न्हावे कमिटीचे अध्यक्ष राजेश काळूराम घरत,उपाध्यक्ष जयेंद्र जनार्दन पाटील,नितीन भरत भोईर, सतीष दत्ताराम भोईर,सुशांत बांद्रे,खजिनदार  निलेश हरिश्चंद्ध भोईर,सहखजिनदार  अनंत लहु म्हात्रे,चेतन लक्ष्मण कडू,समाधान सदानंद म्हात्रे ,सरपंच  विजेद्र गणेश पाटील,उपसरपंच शैलेश विठ्ठल पाटील आणि हिरालाल हरी पाटील , सुहास पाटील,जयवंत पाटील मनीष गणेश भोईर अशोक  दामू भोईर, गणेश भोईर तसेच मंडळ सदस्य, सभासद तसेच संबंधित अन्य पदाधिकऱ्यांनी यांनी विशेष मेहनत घेतली.

              पालखी सोहळ्यांसाठी मुंबई, ठाणे व पनवेल तसेच उरण तालुक्यातील आगरी-कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहीले होते. गावदेवीचे देऊळ गावकऱ्यांच्या सहभागाने बांधण्यात आले आहे. ही देवी नवसाला पावते म्हणून महाराष्ट्र व परराज्यातूनही अनेक भाविक येथे दर्शनाला येतात. गावदेवीची प्रसन्न व लोभसवाने रुप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळे भरून पाहावे .सर्व भक्तांनी आरोग्य,सुख,शांती प्रदान करण्याची विनंती देवीला केली असे सदर गावचे सुपुत्र अशोक दामू भोईर यांनी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment

भिवंडी तालुक्यातील केवणी (दिवे) खाडी किनाऱ्यावरून दररोज होते शेकडो हायवा डंपर मधून "हजारो ब्रास" रेतीची चोरटी वाहतूक, कारवाई फक्त एका वाहनावर, ग्रामस्थांमधून आचर्य व्यक्त !!

भिवंडी तालुक्यातील केवणी (दिवे) खाडी किनाऱ्यावरून दररोज होते शेकडो हायवा डंपर मधून "हजारो ब्रास" रेतीची चोरटी वाहतूक, कारवाई फक्त ...