जि.प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा, कळझोंडी क्रमांक –२ शाळेचा ७५ वर्षांचा गौरवशाली प्रवास !!
प्रतिनिधी - निलेश कोकमकर
एकीकडे जिल्हापरिषदच्या शाळा बंद होत असताना रत्नागिरी मधील कळझोंडी गावातील जि.प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा, कळझोंडी क्रमांक –२ शाळेचा अमृत महोत्सव शनिवार, दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी हा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. हे सर्व शिक्षणप्रेमी यांच्या मोठी अभिमानाची बाब आहे. ह्या जिल्हा परिषद शाळेचा ७५ वर्षांचा गौरवशाली प्रवास कळझोंडी गावातील शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारी जि.प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा, कळझोंडी क्रमांक – २ ही शाळा यंदा आपल्या स्थापनेची ७५ वर्षे पूर्ण करत असून ह्याच विद्यामंदिरात शिकुन आपले उज्वल भवितव्य घडवणारे आजी - माजी विद्यार्थी अमृत महोत्सव वर्ष मोठ्या उत्साहात साजरा करणार आहेत. गेल्या सात दशकांहून अधिक काळात या शाळेने असंख्य विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर संस्कार, मूल्ये आणि जीवनाला दिशा देणारे मार्गदर्शन दिले आहे.
या शाळेच्या अंगणातून घडलेली अनेक पिढी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असून, त्या प्रत्येक यशामागे या ज्ञानमंदिराचा मोठा वाटा आहे. त्यामुळे हा अमृत महोत्सव केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून, माजी विद्यार्थ्यांच्या मनातील कृतज्ञतेची जिवंत अभिव्यक्ती ठरत आहे.
विशेष म्हणजे, शाळेचा हा अमृत महोत्सव सोहळा अधिक भव्य आणि संस्मरणीय करण्यासाठी माजी विद्यार्थी संघाने पुढाकार घेतला असून अत्यंत नियोजनबद्ध व उत्साही पद्धतीने हा उपक्रम राबविला जात आहे. शाळा समिती, शिक्षकवृंद आणि गावातील हितचिंतक यांच्या सहकार्याने हा सोहळा साकार होत असून, सर्व स्तरातून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या निमित्ताने आकर्षण म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, माजी विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या सांस्कृतिक उपक्रमांसाठी लागणारा निधी माजी विद्यार्थी संघाने आर्थिक मदतीचे आवाहन करत पुढाकार घेतला आहे.
माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि गावातील हितचिंतकांकडून यथाशक्ती आर्थिक देणगीच्या माध्यमातून या उपक्रमाला मोठा पाठिंबा मिळत आहे. “ज्यांनी आपल्याला घडवलं, त्यांच्यासाठी थोडंसं देणं हीच खरी कृतज्ञता” या भावनेतून अनेकांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. या शैक्षणिक उपक्रमामध्ये आपणही सर्वांनी बहुसंख्येने सामील होऊन सहकार्य करावे अशी आवाहन करण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी संदीप वीर (Google Pay: 9594106543) यांच्यामार्फत देणगी स्वीकारली जात असून, तसेच संतोष निंबरे:- 8928790705, गणेश पाष्टे :- 9819713765, एकनाथ निंबरे:- 9820420989, प्रकाश घाणेकर :- 9619112013 सुधाकर वीर :- 9930795438 यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.
या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण असून, माजी विद्यार्थी संघाच्या नेतृत्वाखाली हा सोहळा अत्यंत देखण्या व नियोजनबद्ध पद्धतीने साकार होत आहे. हा उपक्रम केवळ उत्सव न राहता, पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, यात शंका नाही.
No comments:
Post a Comment