Monday, 6 April 2026

मूठभर धान्य व घोटभर पाणी ही संकल्पना राबवून शिव प्रतिष्ठान करंजाडे व शिव मावळे यांनी साजरा केला जागतिक जल दिवस !!

मूठभर धान्य व घोटभर पाणी ही संकल्पना राबवून शिव प्रतिष्ठान करंजाडे व शिव मावळे यांनी साजरा केला जागतिक जल दिवस !!

मुक्या पशु पक्षी प्राण्यांसाठी पाणी व खाद्याची व्यवस्था

उरण दि ६, (विठ्ठल ममताबादे) :
शिव प्रतिष्ठान करंजाडे व शिव मावळे यांच्या वतीने जागतिक जल दिवसाचे औचित्य साधून मूठभर धान्य व घोटभर पाणी ही संकल्पना राबविण्यात आली.ज्या प्रमाणे माणसाच्या ३ गरजा आहेत त्याच प्रमाणे पक्षी व प्राण्यांच्या देखील तश्याच प्रकारे गरजा आहेत सध्या उन्ह्याचे दिवस आहेत पक्षांना व मुक्या प्राण्यांना सध्या पाणी व खाऊची गरज आहे हयाचेच भान ठेऊन शिव प्रतिष्ठान करंजाडे यांच्या वतीने मूठभर धान्य व घोटभर पाणी ही संकल्पना करंजाडे मध्ये मोठ्या उत्साहात राबविण्यात आली. ह्या कार्यक्रमाला शिव प्रतिष्ठान अध्यक्ष सत्यजित पाटील, सचिव राकेश कुसळे ,सुनील अंबावडे , अविनाश ठोसर ,सुरेश बारवे ,अमर कुसळे ,तुषार कदम ,योगेश कुलाल ,अमर सावंत , रोशन शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. 

ह्या वेळी शिव प्रतिष्ठानच्या वतीने  निसर्ग व पर्यावरणचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सर्वांनी पक्षांसाठी व पाळीव प्राण्यांसाठी अश्या संकल्पना राबविल्या पाहिजेत. असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. निसर्ग व सजीव सृष्टी टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजेत असा संदेश प्रत्यक्ष कृतीतून सदर संस्थेने सर्वांना दिला आहे. शिव प्रतिष्ठान करंजाडे व शिव मावळे यांच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक, पर्यावरणपूरक अनेक उपक्रम राबविले जातात. शिव प्रतिष्ठान करंजाडे व शिव मावळे यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या मूठभर धान्य व घोटभर पाणी या उपक्रमामुळे मुक्या प्राण्यांना पाणी व अन्न, खाद्य उपलब्ध होणार आहे त्यामुळे उन्हाळा मध्ये मुक्या पशु पक्षी प्राण्यांचे मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे.सदरच्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उपायुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी !!

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उपायुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी !! कल्याण, प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे  घ...