Monday, 6 April 2026

प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोलीच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त ; डेंगूच्या साथीने नागरिक हैराण !!

प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोलीच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त ; डेंगूच्या साथीने नागरिक हैराण !!


** डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी कोणतीही ठोस उपाय योजना नसल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ.

उरण दि ६ (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निष्क्रिय कारभारामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या कोप्रोली पाणदिवें गावात डेंग्यूची साथ मोठ्या झपाट्याने पसरत आहे. गावात २५ ते ३० पेशंट सापडले आहेत, अजूनही हि संख्या वाढतच आहे अशा परिस्थितीत आरोग्य केंद्रामार्फत फक्त नॉर्मल पहाणी व फवारणी केली आहे. पण डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी कोणतीही ठोस उपाय योजना नसल्याने पेशंट वाढतच आहेत. आरोग्य केंद्रात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, औषधांचा तुटवडा आणि वेळेवर सेवा न मिळाल्याने रुग्णांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या मते, अनेक वेळा आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर नसतात. त्यामुळे लहानसहान आजारांसाठीही रुग्णांना उरण किंवा पनवेल येथील मोठ्या रुग्णालयात जावे लागते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि लहान मुलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

आरोग्य केंद्रात स्वच्छतेचा अभाव, अपुरी साधनसामग्री आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. काही ग्रामस्थांनी सांगितले की, तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य ती दखल घेतली जात नाही.

दरम्यान, नागरिकांनी संबंधित आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देऊन डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, तसेच आवश्यक औषधे व सुविधा तत्काळ उपलब्ध कराव्यात, डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने तात्काळ ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे.

या प्रकरणी आरोग्य विभागाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करणे गरजेचे असून, अन्यथा नागरिकांकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ मंडळ पाणदिवे यांच्यामार्फत देण्यात आला आहे

No comments:

Post a Comment

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उपायुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी !!

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उपायुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी !! कल्याण, प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे  घ...