नागरी संरक्षण विभागाची अंबरनाथ येथे विभागीय कार्यशाळा संपन्न !!
बातमीदार प्रतिनिधी : ता. ५, अंबरनाथ, दि. ०२ एप्रिल २०२६ नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे कार्यालयाच्या अंतर्गत तसेच मा. श्री विजय जाधव साहेब, उपनियंत्रक यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली दि. ०२/०४/२०२६ रोजी नागरी संरक्षण कार्यालय, अंबरनाथ येथे विभागीय क्षेत्ररक्षक व उपविभागीय क्षेत्ररक्षक यांच्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेला एकूण ३६ मानसेवी अधिकारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी व क्षेत्ररक्षकांना नागरी संरक्षणाच्या विविध जबाबदाऱ्या, आपत्ती व्यवस्थापनातील भूमिका, आपत्कालीन परिस्थितीत समन्वय साधण्याच्या पद्धती, बचावकार्याचे नियोजन, तसेच स्थानिक पातळीवरील तातडीच्या उपाययोजनांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेदरम्यान मा. उपनियंत्रक यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन करत नागरी संरक्षण दलाची जबाबदारी, शिस्त, तत्परता आणि आपत्तीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाऱ्या कृती यांचे महत्त्व अधोरेखित केले.
तसेच विभागीय आणि उपविभागीय स्तरावर कार्यरत क्षेत्ररक्षकांनी आपापल्या क्षेत्रातील अनुभव, अडचणी आणि उपाययोजना यावर विचारमंथन केले.
या कार्यशाळेमुळे मानसेवी अधिकाऱ्यांचे कौशल्य वृद्धिंगत होण्यास मदत झाली असून भविष्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षमपणे हाताळण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Regards – DCCD, Thane
सौजन्य/वृत्त - विश्वनाथ राऊत सर
No comments:
Post a Comment