Saturday, 25 April 2026

उरणच्या ज्योती पाटील आदर्श मुख्याध्यापिका तर प्रदीप म्हात्रे आदर्श पुरस्काराने सन्मानित !!

उरणच्या ज्योती पाटील आदर्श मुख्याध्यापिका तर प्रदीप म्हात्रे आदर्श पुरस्काराने सन्मानित !!

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) :
जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट दादर, मुंबई यांच्यातर्फे २४ एप्रिल २०२६ रोजी संस्थेचा  १३५ वा वर्धापन दिन छबीलदास हायस्कुल दादर मुंबई येथे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उपमहापौर  संजय घाडी, मुकुंद चितळे, देवचंद राका आदी मान्यवर उपस्थित होते. विविध मान्यवर व संस्थेचे सर्व पदाधिकारी,मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न  झाला.
कै.गो.ना.अक्षीकर विद्यासंकुलातील ज. ए. इ ची इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा, उरणच्या मुख्याध्यापिका ज्योती पाटील  यांना आदर्श मुख्याध्यापिका, तर एन.आय.हायस्कूल मधील वरीष्ठ लिपिक प्रदिप म्हात्रे यांना शाळेकरीता विद्यार्थ्यांकरीता उत्तम कामगिरी केल्या बद्दल आदर्श पुरस्कार देण्यात आले.ज्योती पाटील यांना आदर्श मुख्याध्यापिका तसेच वरिष्ठ लिपिक प्रदीप म्हात्रे यांना आदर्श पुरस्कार मिळाल्याने या दोघांवर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.मुख्याध्यापिका ज्योती पाटील तसेच वरिष्ठ लिपिक प्रदीप म्हात्रे त्यांनी शिक्षण क्षेत्रात बजावलेल्या महत्वाच्या सेवे बद्दल, उत्तम कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने विद्यार्थी, पालकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

No comments:

Post a Comment

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कल्याण यांच्या कार्यालयावर शिवसेनेची धडक : नागरिकांच्या वाहतूक समस्यांवर जाब !!

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कल्याण यांच्या  कार्यालयावर शिवसेनेची धडक : नागरिकांच्या वाहतूक समस्यांवर जाब !!       *कल...