उरण मध्ये श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा !!
उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) :
उरण शहरात तसेच उरण तालुक्यातील विविध ग्रामीण भागात श्री हनुमान जन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. पागोटे, हनुमान कोळीवाडा, वेश्वि, वशेणी, करंजा आदी गावात तसेच उरण शहरात भाजी मार्केट बाजारपेठ तसेच गणपती चौकात श्री हनुमान जन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा झाला.
उरण शहरातील गणपती चौकात श्री हनुमान जन्मोत्सव सामाजिक मंडळ उरण यांच्या वतीने पहाटे ४ वाजता महापूजा, पहाटे ५ वाजता हभप सुधीर विश्वनाथ बाळ यांचे सुश्राव्य असे किर्तन झाले. भाविक भक्तांना कल्पेश ठक्कर यांच्या माध्यमातून उपवासाच्या खिचडीचे वाटप करण्यात आले. सकाळी ८ ते १२ या वेळेत श्री गजानन प्रसादिक भजन मंडळ यांचे भजन झाले. श्री गजानन प्राथमिक भजन मंडळाचे बुवा वसंत मांडेलकर,गणेश सावंत, शैलेश राऊत, भारत पाटील, जगदीश भोईर, भालचंद्र म्हात्रे, कु. वेदांत, सन्नी मांडेलकर आदींनी उत्तम असे भजन गाऊन रसिक प्रेषक भाविक भक्तांना मंत्र मुग्ध केले. दुपारी १२ ते ३ या वेळेत कै. सुनिता महादेव ढोले, कै. मीना के रूपचंदानी यांच्या स्मरणार्थ महाप्रसाद देण्यात आले. त्यानंतर शारदा संगीत भजन मंडळ विचुंबे यांचे भजन झाले. शेवटी पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीला श्री गजानन प्रासादिक भजन मंडळाची साथ संगत लाभली. मंदिरात श्री हनुमान मूर्तीचे दर्शन घेतलेल्या विविध प्रतिष्ठित मान्यवरांचे यावेळी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दिवसभर चाललेल्या विविध कार्यक्रमांना भाविक भक्तांचा उत्तम प्रतिसाद लाभला. भाविक भक्तांची दिवसभर गर्दी पहावयास मिळाली. सर्वच भावीक भक्तांनी शांततेत रांगेत उभे राहून शिस्तीने दर्शन घेतले. सर्वच कार्यक्रम उत्तमपणे संपन्न झाले. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अशोक कडू, उपाध्यक्ष महेश अधिकारी, कार्याध्यक्ष विपुल पारेख, सचिव ऍड.रोहित पाटील, सहसचिव ऍड.रेखा पाटील, खजिनदार धनंजय भागवत, सहखजिनदार मनोज म्हात्रे, सल्लागार विठ्ठल ममताबादे, व्यवस्थापक निर्मला ममताबादे, ह भ प भालचंद्र म्हात्रे, रघुनाथबुवा हातनोलकर यांच्यासह सर्व कार्यकारी पुरुष सभासद, कार्यकारी महिला सभासद - सुविधा म्हात्रे, प्राजक्ता भागवत, मिलिंदा माळी यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment