Thursday, 2 April 2026

उरण महाविद्यालयात बँकिंग, वित्त आणि विमा क्षेत्र या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम !!

उरण महाविद्यालयात बँकिंग, वित्त आणि विमा क्षेत्र या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम !!

उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) :
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील अकाउंटिंग अँड फायनान्स विभाग व करियर कट्टा विभागाच्या वतीने महाविद्यालयात बँकिंग, वित्त आणि विमा क्षेत्र (सर्टिफिकेट प्रोग्राम इन बँकिंग, फायनान्स अँड इन्शुरन्स) या विषयावर चाळीस दिवसांचा पूर्णवेळ प्रमाणपत्र कोर्स आयोजित केला गेला.  सुब्रमण्यम सर, मंदार सर व अमोल सर यांनी विद्यार्थ्यांना ४० दिवस प्रशिक्षण दिले. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांनी बँकिंग, विमा व वित्त या क्षेत्राविषयी नॉलेज प्राप्त केले. या प्रमाणपत्र अभ्यासक्रम समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे हे होते. त्यांनी कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व या कोर्समध्ये संवाद कौशल्य, आर्थिक साक्षरता, विमा चे महत्व त्याचबरोबर, सार्वजनिक वागणुकीचे कौशल्य  व समूह चर्चा इत्यादी स्किल विद्यार्थ्यांना या कोर्स मधून मिळाले असल्याचे सांगितले. तर आयक्यूएसी समन्वयक डॉ. ए आर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून मोठ्या व्यवसायाची स्वप्न पाहिली पाहिजे व सातत्याने स्वतःला प्रेरित करून यश प्राप्त केले पाहिजे असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एच.के. जगताप यांनी केले व या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा उद्देश सांगितला. प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात कु. रिमझिम गोंड व कु. जय कोळी यांनी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन अकाउंटिंग अँड फायनान्स विभागाचे कॉर्डिनेटर प्रा. रियाज पठाण यांनी केले. तर उपस्थित आभार प्रा.  विनिता तांडेल यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. पूजा गुप्ता, प्रा. दिपू यादव यांनी मेहनत घेतली. समारोपीय कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र देऊन गौरवीन्यात आले

No comments:

Post a Comment

उरण महाविद्यालयात बँकिंग, वित्त आणि विमा क्षेत्र या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम !!

उरण महाविद्यालयात बँकिंग, वित्त आणि विमा क्षेत्र या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम !! उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) : कोकण ज्ञानपीठ...