Sunday, 17 May 2026

ऑनलाईन औषध विक्री विरोधात २० मे रोजी उरणसह देशभरातील केमिस्टचा 'एक दिवसीय बंद'; शासकीय कार्यालयांना दिले निवेदन !

ऑनलाईन औषध विक्री विरोधात २० मे रोजी उरणसह देशभरातील केमिस्टचा 'एक दिवसीय बंद'; शासकीय कार्यालयांना दिले निवेदन !

उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) :
केंद्र सरकारच्या ऑनलाईन औषध विक्री धोरणाचा निषेध करण्यासाठी बुधवार, दिनांक २० मे २०२६ रोजी भारत देशातील सर्व केमिस्ट दुकानदारांनी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्रीमुळे अंमली पदार्थांसारखी नशा आणणारी व व्यसन जडवणारी औषधे सहज उपलब्ध होण्याची भीती असून, याचा समाजावर अतिशय गंभीर परिणाम होऊ शकतो. या धोक्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, उरण येथील 'हॉटेल आनंदी' येथे 'उरण तालुका केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन'ची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. 

       रायगड जिल्हा केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे अध्यक्ष लीलाधर पाटील आणि जिल्हा सचिव प्रवीण नावंदर यांच्या सूचनेनुसार, बंद दरम्यान नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून केवळ 'इमर्जन्सी पेशंट' (अतितातडीचे रुग्ण) यांच्यासाठी औषध पुरवठा सुरू ठेवण्याची विशेष सूचना करण्यात आली आहे. 

       उरण तालुक्यातील हॉटेल आनंदी येथील बैठकीत उरण तालुका केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष उमाकांत पानसरे, तालुका सचिव राजेश्वर पाटील आणि तालुका ओबीसी प्रतिनिधी मनोज ठाकूर यांनी उपस्थित सर्व सभासदांना या आंदोलनाचे गांभीर्य पटवून देत सविस्तर मार्गदर्शन केले. पदाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील सर्व केमिस्ट सभासदांनी या बंदला जाहीर सहमती दर्शवली. बैठकीच्या शेवटी सर्व औषध विक्रेत्यांनी 'केमिस्ट एकता जिंदाबाद' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. 

    या बंद आंदोलनाची अधिकृत माहिती आणि जिल्हा असोसिएशनचे निवेदन उरण मधील प्रमुख शासकीय कार्यालयाने देण्यात आले. यामध्ये  आमदार कार्यालय उरण,तहसीलदार कार्यालय, उरण पोलीस स्टेशन उरण या सर्व कार्यालयामध्ये २० मे रोजीच्या भारत बंद बाबत अधिकृत निवेदन सुपूर्द  करण्यात आली आहे. त्याप्रसंगी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी केमिस्ट असोसिएशनला प्रशासनाच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचा असा कार्यात्मक आश्वासन दिले नागरिकांनीही राष्ट्रीय जनहितार्थ बंदला सहकार्य करावे असे आवाहन असोसिएशन  तर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

*“अर्धवट महामार्गावर टोल कशासाठी ?” — संतोष पटकारे यांचा सरकारला थेट सवाल*

*“अर्धवट महामार्गावर टोल कशासाठी ?” — संतोष पटकारे यांचा सरकारला थेट सवाल* *मुंबई-गोवा महामार्गावरील टोल वसुली तात्काळ बंद करण्याची मागणी* ...