Sunday, 17 May 2026

मोरा मत्स्यव्यवसायिक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न !!

मोरा मत्स्यव्यवसायिक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न !!

** माजी आमदार  मनोहरशेठ भोईर, उरण नगराध्यक्ष  भावना घाणेकर व माजी नगराध्यक्ष  गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती.

उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील मोरा येथील मोरा मत्स्यव्यवसायिक विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित यांच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे रविवार दिनांक १७ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरास उरण चे माजी आमदार  मनोहरशेठ भोईर, उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, माजी नगराध्यक्ष  गणेश शिंदे, उरण शहर संपर्कप्रमुख  गणेश म्हात्रे, गटनेते व नगरसेवक  अतुल ठाकूर,नगरसेविका नायदा ठाकूर, नगरसेविका श्रीमंती वंदना पवार, उपशहरप्रमुख  कैलास पाटील, डॉ नयना ठाकुर, विविध आजाराचे तज्ञ डॉक्टर, वैद्यकीय स्टाफ व मान्यवर पदाधिकाऱ्याची शिबिरास उपस्थिती लाभली होती, न्यू इंग्लिश स्कूल मोरा कोळीवाडा, उरण येथे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सचिव  नारायण पांडुरंग कोळी यांच्या हस्ते करण्यात आले, शुश्रुषा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल, पनवेल, मॅक्स विजन सुपर स्पेशलिस्ट आय हॉस्पिटल, द्रोणागिरी व श्री पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, उरण यांच्या सहकार्याने आयोजित केलेला या शिबिरात ई सी जी तपासणी, रक्ताच्या विविध चाचण्या तपासणी, नेत्र तपासणी, शुगर व बीपी तपासणी करण्यात आली या शिबिरास मोरा विभागातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला
 
सदर मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन मोरा मत्स्यव्यवसायिक विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादितचे अध्यक्ष  राकेश नामदेव कोळी, उपाध्यक्ष कल्पना जितेंद्र मोरेकर, सचिव  नारायण पांडुरंग कोळी, सदस्य  हेमंत गोविंद कोळी,  शेखर रामा कोळी, सुनील भगवान कोळी, प्रशांत दत्ताराम कोळी,  सुहास भरत कोळी,  नंदादीप मोरेश्वर कोळी,  गजेंद्र कैलास कोळी, मयूर राम पांचाळ,  जयेश हरीचंद्र कोळी, पूजा सदानंद कोळी,  आरती शेखर कोळी, मार्गदर्शक  सुनील गायकवाड व कार्यकर्ते यांनी केले होते.

No comments:

Post a Comment

*“अर्धवट महामार्गावर टोल कशासाठी ?” — संतोष पटकारे यांचा सरकारला थेट सवाल*

*“अर्धवट महामार्गावर टोल कशासाठी ?” — संतोष पटकारे यांचा सरकारला थेट सवाल* *मुंबई-गोवा महामार्गावरील टोल वसुली तात्काळ बंद करण्याची मागणी* ...