Monday, 18 May 2026

जेएनपीएचे चेअरमन गौरव दयाळ यांचे महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन !!

जेएनपीएचे चेअरमन गौरव दयाळ यांचे महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन !!

उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) : आशिया खंडातील सर्वात मोठे बंदर असलेले उरण येथील सुप्रसिध्द जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण या बंदराचे (जेएनपीए) चेअरमन म्हणून गौरव दयाळ यांची नियुक्ती झालेली आहे. गौरव दयाळ हे २००४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे जागतिक पातळीवर कामगारांचे नेतृत्व करतात. त्यामुळे जेएनपीएचे चेअरमन गौरव दयाळ यांची नुकतीच भेट घेऊन महेंद्रशेठ घरत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी त्यांनी त्यांच्याशी संवाद साधून जेएनपीएतील कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधण्यात आला. यावेळी किरीट पाटील आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

मोहने परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रिक्षा युनियन आक्रमक !!

मोहने परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रिक्षा युनियन आक्रमक !! *रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्यांचा विळखा; नागरिक आणि रिक्षाचालक त्रस्त* ...