Thursday, 4 June 2020

क्वारंटाईन केलेल्या संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यास दिरंगाई !

क्वारंटाईन केलेल्या संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यास दिरंगाई !


भुसावळ प्रतिनिधी :- शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ज्या भागात कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण आढळून येत आहे त्या भागातील क्वारंटाईन केलेल्या संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यास दिरंगाई होत असल्याचे निवेदन भाजपा नगरसेविका यांनी सार्वजनीक आरोग्य मंत्री यांना दिले.

सविस्तर वृत्त असे की,महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जळगांव शहरात दौऱ्यावर येऊन केव्हिड -19 सेंटर भेट दिली.त्यानंतर भुसावळ मध्ये उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांच्या कार्यालयात सर्व पक्षीय बैठक घेऊन शहरातील जनतेच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.यावेळी भाजपाची नगरसेविका मेघा देवेंद्र वाणी यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना क्वारंटाईन केलेल्या संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यास दिरंगाई होत असल्याचे निवेदन दिले.यामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना व जवळच्या व्यक्तींना क्वारंटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईन केले जात आहे.आठवडा झाल्यानंतरही त्यांचे स्वॅब घेतले जात नसून तपासणी साठी पाठविण्यात येत नसून घेतले तर त्यांचा रिपोर्ट चार ते पाच दिवसांनंतरही येत नाही.त्यामुळे त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये दहा ते बारा दिवस राहावे लागत आहे.त्याठिकाणी भरपूर संशयित रुग्ण असल्या कारणाने त्यांना संसर्ग होण्याचा धोका निर्माण होतो.तसेच क्वारंटाईन केलेल्या नातेवाईक व परिवारातील व्यक्तींना त्रास सहन करावा लागत आहे.यासाठी यंत्रणेला लवकरात-लवकर स्वॅब तपासणीसाठी नेण्यास व रिपोर्ट लवकर देण्याचे आदेश देण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी अखिल भारतीय लेवा पाटीदार महासंघाचे शहर अध्यक्ष देवेंद्र वाणी, रुपेश चौधरी,श्याम भारंबे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

महेंद्रशेठ घरत यांचा साई मंदिर वहाळतर्फे सत्कार !!

महेंद्रशेठ घरत यांचा साई मंदिर वहाळतर्फे सत्कार !! उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) : आंतरराष्ट्रीय कामगार नेते  महेंद्रशेठ घरत हे आ...