प्रभाग क्रमांक १६ मधील मनसेचे युवा नेते आर्किटेक्ट गणेश नाईक यांच्या पाठपुराव्याला यश
कल्याण प्रतिनिधी,
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १६ ह्या प्रभागात सुध्दा काही समस्या आहेत व काही उद्भवितात याची येथील रहिवासी युवा नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर सहसचिव आर्किटेक्ट गणेश नाईक तसेच यांचे सहकारी परिसरातील जुने रहिवासी व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील उतेकर यांना प्रभागातील समस्यांची जाणीव आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेच्या सैनिकांनी आपल्या परिसरातील समस्या सोडविण्यासोबत परिसरातील विकासावर लक्ष देणे गरजेचे आहे.
राजसाहेंबाच्या विचारांनी प्रेरित झालेले युवा नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर सहसचिव आर्किटेक्ट गणेश नाईक हे आपल्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी धडपडत असतात अगदी असलेल्या समस्यांचा त्या त्या स्थानिक प्रशासनाकडे ( महानगरपालिका, म.रा.वि.म., पोलिस स्टेशन, इत्यादी) पाठपुरावा करून व जातीने उपस्थित राहून लक्ष देऊन सोडविण्याचा प्रयत्न करतात.
अशीच एक समस्या प्रभाग क्रमांक १६ येथील फॉरेस्ट कॉलनी येथे तुंबलेली ड्रेनेज लाईन यासाठी दोन महिन्यांपासून वेळोवेळी पाठपुरावा करून स्वत: उपस्थित राहून साफ करून घेतली व महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्यासाठी आभार मानले.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना जिथे जिथे नागरिकांना समस्या असणार किंवा नागरी कामे तुंबणार तिथे मनसे पोहचणार.


No comments:
Post a Comment