Saturday, 6 June 2020

जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मुरबाड तालुक्यात संपन्न!

जागतिक पर्यावरण दिनानिम्मित्ताने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मुरबाड तालुक्यात संपन्न !!


    

मुरबाड ( मंगल डोंगरे )काल शुक्रवार,दि. ५ जुन २०२० रोजी जागतिक पर्यावरण दिनानिम्मित्ताने महाराष्ट्र काॅंग्रेस पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.अशोकराव मोरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ५ जुन २०२० ते ५ जुलै २०२० या महिन्यात संपुर्ण महाराष्ट्रात ११ लाख वृक्ष लागवड संकल्पाची सुरूवात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात प्रदेश सरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी केली. सदरच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष नरेश मोरे, पोलीस पाटील संघटनेचे जयवंत पवार, पत्रकार शंकर करडे, माजी सरपंच प्रकाश पवार, ग्रा.पं.सदस्य बारकु पवार, तानाजी पष्टे, रमेश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. पहिल्या टप्प्यामध्ये ५०० वृक्षांची लागवड ज्यामध्ये हापुस आंबे, काजु, सीताफळ यांची जवळपास १०० झाडे तर बांबु ची ४०० रोपे यावेळी पुर्ण दिवसभरात श्रमदानातुन लावण्यात आली. संपुर्ण जिल्ह्याभरात झाडांची लागवड विविध टप्प्यात करण्यात येणार असल्याचे तसेच जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना फळझाड लागवडीसाठी प्रशिक्षणाची गरज असल्याचे जिल्हाध्यक्ष नरेश मोरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 



महाराष्ट्र राज्यामध्ये ३६ जिल्हे असुन ३५५ तालुके आहेत त्यामुळे जर प्रत्येक तालुक्यात जर आपण ३१०० वृक्ष याप्रमाणे जर लागवड केली तर आपलं लक्ष आपण सहजरितीने पुर्ण करु शकतो आणि त्या अभियानाची सुरवात आज मुरबाड तालुक्यातील आंबेळे बु यागावी करण्यात आल्याचे प्रदेश सरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी प्रतिपादन केले.

No comments:

Post a Comment

मुंबईतील मृत्यूनंतर उरण मध्ये कलिंगड विक्रीला फटका ; उरण मधील बाजारावर परिणाम !!

मुंबईतील मृत्यूनंतर उरण मध्ये कलिंगड विक्रीला फटका ;  उरण मधील बाजारावर परिणाम !! ** व्यापाऱ्यांना नुकसान होण्याची भीती. उरण दि ...