जर्सी गाईची अज्ञातांकडून गोहत्या!
मोहने येथील खळबळजनक घटना.
कल्याण ( संजय कांबळे)
आज पहाटे तीन साडेतीनच्या दरम्यान मोहने येथील एन.आर.सी कॉलनीतील रिकाम्या असणार्या घरातील बांधलेल्या म्हशी आणि जर्सी गाय यातूनबांधलेल्या एका जर्सी गाईला बाहेर काढून तिची हत्या करून मास काढून नेल्याने येथे प्रचंड खळबळ उडाली आहे. यासंदर्भात खडकपाडा पोलिसांनी याला दुजोरा दिला असून तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
मोहने येथील गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून दूध विक्रीचा धंदा करीत असणारे संतोष रामधनी सिंग यावरच आपल्या कुटुंबीयांची उपजीविका करत आहेत. आज पहाटे चार साडेचारच्या सुमारास गाई व म्हशीचे दूध काढण्याकरता ते गेले असता त्यांची जर्सी गाय वेसन तोडून गेल्याचे लक्षात आल्याने तिचा लगेच शोध घेऊ लागले. गाय बांधलेल्या गोठ्यातून काही अंतरावर त्यांना जर्सी गाईचा पोटातील कोथळा बाहेर पडल्याचे निदर्शनास आला. आणि या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोहने परिसरात मोठी खळबळ माजली.
यापूर्वी मोहने परिसरात जनावरांना विषारी औषध देऊन मारल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. मात्र गोठ्यातून जर्सी गाई ला बाहेर काढून तिला पाणी पाजून तिची हत्या केल्याची घटना प्रथमच या शहरात घडली आहे.
याबाबत पशुवैद्य अधिकारी पोटातील राहिलेल्या अवशेषांवर तपासणी करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली असून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी, खडकपाडा पोलीस स्टेशनचे सीनियर इन्स्पेक्टर यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.
यासंदर्भात संतोष सिंग यांना विचारणा केली असता एखाद्या व्यसनाधीन असलेल्या गंजाडीच्या सांगण्यावरून हा प्रकार घडला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून याबाबत खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक बोऱ्हाटे यांनी गुन्हा दाखल होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment