"बदलापूर शहरात कोरोनाग्रस्त रुग्णाच्या वाढत्या समस्या निवारण करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपेनी दिली भेट"
अरुण ठोंबरे, बदलापूर :
बदलापूर शहरात दररोज कोरोनाग्रस्त रुग्णाचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन व आरोग्य यंत्रणेला अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. या साठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उपस्थित डॉक्टर' कैलास पवार, जिल्हाशिकारी राजेश नार्वेकर , प्रशासक गिरासे, मुख्याधिकारी दिपक पुजारी, पोलिस प्रशासन अधिकारी राजकीय लोकप्रतिनिधी, वैद्यकीय अधिकारी , यांची संयुक्त चर्चा करून धाडसी निर्णय घेण्यात आले.
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, अधिकारी गिरासे साहेब, जिल्हाआरोग्य अधिकारी कैलास पवार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी,तहसीलदार देशमुख डीसीपी शेवाळे आरोग्य व अन्य विभागाचे अधिकारी तसेच डॉक्टरांच्या आयएमए संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि बदलापूर शहरातील लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत नगरपालिका सभागृहामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत विविध मागण्या उपस्थित केल्या.
1.बदलापूर-अंबरनाथ परिसरात कोरोना विषाणू तपासणीची लॅबोरेटरी.
2. प्लाझ्मा थेरेपी सेंटर.
3. अतिरिक्त डॉक्टर्स व नर्सची टिम
4. व्हेंटिलेटर, पीपीई किट्स, फेसमास्क, ग्लोव्हज यासह आवश्यक औषधे.
5. बदलापूर शहरातील क्रिटिकल पेशंट्ससाठी इथेच सुविधा उपलब्ध नसल्याने ठाणे, कल्याण अशा जवळच्या शहरांमधील रुग्णालयांमध्ये न्यावे लागते परंतु तिथे प्रवेश दिला जात नाही, तो मिळावा. वरील मागण्यांना प्रतिसाद देत पुढच्या पंधरा दिवसात बदलापूर शहरासाठी 1.स्वतंत्र टेस्टिंग लॅब 2.कोविडच्या लढ्यासाठी आवश्यक साधनसामुग्री व औषधे तसेच 3. मोफत रुग्णवाहिका सेवा देखील तातडीने देण्यात येईल असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.
4.बाहेरच्या शहरांमधील कोविड रुग्णालयांमध्ये प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून तातडीने तशा सूचना नजीकच्या शहरातील रुग्णालयांना देण्यात येतील. 5.बदलापूर नगरपालिकेतर्फ अद्ययावत सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल साठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना मंत्रीमहोदयांनी केली. यावेळी खाजगी डॉक्टर्सना नगरपालिकेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दररोज किमान तीन तास सेवा देण्याची मंत्रिमहोदयांनी विनंती केली असता आयएमए संघटनेद्वारे लागलीच सहमती दर्शविण्यात आली.


Local people from Badlapur are travelling from Here to Mumbai and other areas which is spreading the virus Epescially those who are working in Govt hospital which involves alot of travel and become hectic for the comman men, hence it is suggested that if they can work to the nearest govt hospital's or other entities whichever is easier which will reduce the spread and also help the govt servants for a healthy and safe environment, Govt. Should take this matter seriously to control this epidemic
ReplyDelete