Monday, 10 August 2020

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्या प्रकरणी, मुरबाड शिवसेना पक्षातर्फे कर्नाटक मधील भाजपा सरकारचा जाहीर निषेध !!

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्या प्रकरणी, मुरबाड शिवसेना पक्षातर्फे कर्नाटक मधील भाजपा सरकारचा जाहीर निषेध !!


मुरबाड (मंगल डोंगरे )
  कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती येथील आपले आराद्य दैवत वंदनीय छञपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राजकीय दबावाने हटविल्याबद्दल या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवाजी चौक मुरबाड येथे ठाणे जिल्ह्याचे पालक मंञी मा.एकनाथजी शिंदे व ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या आदेशानुसार ठाणे जि.प.उपाध्यक्ष सुभाष पवार व तालुका शिवसेना प्रमुख कांतीलाल कंटे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला.या मोर्चामध्ये कर्नाटक राज्यातील भाजपा सरकारचा घोषणा देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
       या मोर्चामध्ये समन्वयक रामभाऊ दळवी,शिवसेना शहर अध्यक्ष रामभाऊ दुधाळे,चंद्रकांत बोष्टे,प्रकाश पवार सर, जि.प.सदस्य रेखाताई कंटे,किसन गिरा,योगिताताई शिर्के,संजय पवार,जगन घुडे,कल्पेश धुमाळ,गुरुनाथ भुंडेरे,वैशाली कराळे,तुकाराम घरत,श्रीकांत कोर,प्रशांत मोरे,एकनाथ व्यापारी,हरिश्चंद्र लाटे,भरत गायकर,कांताराम पवार,बंदू पवार,तानाजी आगिवले,दत्ताञेय शिंगोळे,राजेश पाटील सर,पंकज दलाल,जगन माळी,किरण दळवी इ पदाधिकारी व शिवशैनिक हजर होते.

No comments:

Post a Comment

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!!

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!! उरण दि २, (विठ्ठल...