उल्हासनगर शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध !!
उल्हासनगर, सिध्दांत गाडे - बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुका मनगुत्ती गावात 2 दिवसांपूर्वी अश्वारूढ श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली होती. पण तेथील काही स्थानिक लोकांनी आणि तथाकथित प्रादेशिक अस्मिता मिरवणाऱ्या संघटनांनी या प्रतिष्ठापणेला तीव्र विरोध करत आणि कर्नाटक प्रशासनाने त्यांचीच बाजू घेत गतरात्री ही मूर्ती चौथऱ्यावरून हटवली.
यांचा निषेध शिवसेना उल्हासनगर शहराच्या वतीने उल्हासनगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक उल्हासनगर-३ येथे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून कर्नाटक प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख व उल्हासनगर महानगर पालिकेचे सभागृह नेते राजेंद्र चौधरी, उपशहर प्रमुख राजेंद्र शाहु, संदीप गायकवाड, युवासेना शहर अधिकारी राजेंद्र (बाळा) श्रीखंडे, नगरसेवक चंद्रशेखर यादव, विभाग प्रमुख राजु माने, संजय मरसाळे, दिपक साळवे तसेच उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शिवसैनिक युवासेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थितीत होते.


No comments:
Post a Comment