मुरबाड शिरगाव येथे सोशल डिस्टंसिंग पाळून आदिवासी दिन साजरा !!
"माऊली सामाजिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांनाना वह्यांचे वाटप"
मुरबाड { मंगल डोंगरे }
कोरोना महामारीचे संकट पाहून यावर्षीचा जागतिक आदिवासी दिन हा मोठ्या जल्लोषात साजरा न करता तो गावा गावात, खेड्या पाड्यात वाड्या वस्त्यांवर साजरा करण्याचे समाज संघटनांच्या वतीने ठरले होते.त्या अनुषंगाने काल मुरबाड तालुक्यातील शिरगाव येथे सोशल डिस्टंसिंग पाळून हा दिवस साजरा करण्यात आला .जागतिक स्तरावर ०९ ऑगस्ट हा दिवस आदिवासींच्या कला कौशल्याने व विविध वेशभूषानी मोठ्या संख्येने साजरा केला जात असतो. परंतु या वर्षीच्या कोरोना महासंकटाने पारंपरिक सणांवर विरजण घातल्याने मुरबाड तालुक्यातील शिरगाव येथे सोशल डिस्टंसिंग पाळुन मुरबाड तालुका आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष राजाभाऊ सरनोबत यांनी आध्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महिलांच्या स्वच्छतेसाठी पॅड , मास्क , व फळ वाटप करून आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
या दरम्यान माऊली सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष चौधरी उर्फ (माऊली ) यांनी आदिवासी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले.तर पुढच्या वर्षी जागतिक आदिवासी दिन मोठ्या जल्लोष साजरा करण्याचे व या कार्यक्रमासाठी निशुल्क हॉल उपलब्ध करून देण्याचे आदिवासी बांधवांना वचन दिले .यावेळी सुपरस्टार ऑल सोशल मीडिया चे अध्यक्ष बाळासाहेब भालेराव , मुरबाड न्यूज महाराष्ट्र लाईव्ह चॅनेल चे मुख्य संपादक लक्ष्मण पवार उपस्थित राहून आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या . तसेच या कार्यक्रमाला तालुक्यातील इतर पत्रकार मंडळी उपस्थित होते यावेळी शिरगावचे सरपंच यशवंत चोरगे , मल्हार चोरगे , जगन चोरगे, बबी बाई मुकणे ,विठ्ठल गडगे ,राजूबाई मुकणे इत्यादी आदिवासी बांधव उपस्थित होते.


No comments:
Post a Comment