Friday, 14 August 2020

संभाजी ब्रिगेडने छेडता युद्ध ! चुकीची औषधे देणार्या मेडिकलचा झाला परवाना रद्द !!

संभाजी ब्रिगेडने छेडता युद्ध ! चुकीची औषधे देणार्या मेडिकलचा झाला परवाना रद्द !! 
  
      बोरघर / माणगांव  ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्याच्या   पनवेल परीसरातील एका नामांकित मेडीकल स्टोअरच्या अक्षम्य हलगर्जीपणा मुळे अर्थात चुकीची औषधे दिल्यामुळे एका सर्व सामान्य कुटुंबातील रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. केवळ दैव बलवत्तर म्हणून सदर रुग्ण या दुर्दैवी प्रसंगातून वाचला. 
      सदर मेडिकलच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे सदर रुग्णाला आणि पर्यायाने त्याच्या कुटुंबीयांना प्रचंड शारीरिक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला होता. 
        सदर संतापजनक घटनेची तक्रार जून महिन्या मध्ये संभाजी ब्रिगेड कडे आल्यावर संभाजी ब्रिगेडच्या दक्ष कार्यकर्त्यांनी सदर घटनेची शहानिशा करून सदर पीडित रुग्णाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्या रुग्णावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, आणि त्याला कायदेशीर न्याय मिळवून देण्यासाठी व संबंधित सदर मेडीकल स्टोअरच्या विरूद्ध कठोरात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी निरंतर पाठपुरावा केला. 
      पनवेल संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध पुकारलेल्या या कायदेशीर लढाईला आज आॅगस्ट महिन्यात  अखेर यश आले आणि सदर मेडीकल स्टोअरचे लायसन्स तथा परवाना संबंधित विभागाने रद्द करून संबंधित पिडीत रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला. 
     सदर कायदेशीर लढाई यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे पनवेल कामोठे शहर अध्यक्ष शिवश्री वैभव गोसावी, 
शिवश्री सचिन सावंत देसाई कोकण विभाग अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, शिवश्री सुभाष सावंत नवी मुंबई अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, 
रफिक भाई नेकवारे किंगस ग्रुप महाराष्ट्र संपर्क प्रमुख, शिवश्री
भुषण शिसोदे रायगड जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांनी शेवटपर्यंत अथक परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...