Friday, 14 August 2020

स्वदेस फाऊंडेशन च्या सहकार्याने आदिवासी शेतकर्यांना नुज़िवीडू सीड्सचे भाजीपाला बियाणे वाटप !!

स्वदेस फाऊंडेशन च्या सहकार्याने आदिवासी शेतकर्यांना नुज़िवीडू सीड्सचे भाजीपाला बियाणे वाटप !!


      बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) स्वदेस फाऊंडेशन च्या सहकार्याने नुज़िवीडू सीड्स लि. यांचा माणगाव तालुक्यातील पळसगाव बु. आदिवासी वाडी येथे  भाजीपाला बियाणे संच वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
      सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने व आदिवासी शेतकरी बंधू व भगिनीचे आरोग्य संतुलित राहावे, म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. बियाणे संचामध्ये टोमॅटो, कारले, मिर्ची, वांगे व भोपळा या भाज्यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजीपाल्याचे महत्वाचे गुणधर्म, त्यातील जीवनसत्वे, तो रोजच्या आहारात वापरल्यामुळे होणारे फायदे, या विषयी नुज़िवीडू सीड्स लि. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
       येणाऱ्या 15 दिवसांमध्ये  माणगाव  तालुक्यातील  अडीच हजार आदिवासी शेतकरी बंधू व भगिनींसाठी परसबागेत लावण्यासाठी भाजीपाला बियाणे संचाचे वाटप पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
        आदिवासी शेतकरी बांधवांच्या परसबागेत जाऊन, ताजा भाजीपाला आपल्या परसबागेत कसा पिकवावा व त्याची देखभाल कशी करावी, याविषयी स्वदेस फाऊंडेशन च्या टीमने मोलाचे मार्गदर्शन केले.
       शेवटी पळसगाव विकास समितीच्या वतीने नुज़िवीडू सीड्स लि. व स्वदेस फाऊंडेशन चे आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...