अखेर शहापुर जिवरक्षक फाऊंडेशन च्या प्रयत्नाना म्रुतदेह शोधण्यास आले यश !
मुरबाड (मंगल डोंगरे) : काल झालेल्या खोपिवली दुर्घटनेतील, आंबेळे गावातील काही तरुण खोपिवली येथील"चोंडी" धबधब्यावर पर्यटनासाठी गेले असता यातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यातील एका तरुणाचा काल गुरुवारी मृतदेह आढळून आला होता. परंतु दुसऱ्या तरुणाचा तपास काल पासून सुरू होता. शेवटी पोलीस, एनडीआरएफ, ग्रामस्थांच्या अथक प्रयत्न करून सुद्धा एक म्रुतदेह हाती लगत नव्हता. मात्र आज दुपारी शहापुर येथून आलेल्या जिवरक्षक फांऊडेशन टिमने केलेल्या प्रयत्नांमुळे आज शुक्रवारी संध्याकाळी उशीरा मृतदेह शोधण्यास यश आले.
पर्यटनासाठी गेलेल्या ६ तरुणांपैकी धबधब्यामध्ये दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबत माहिती मिळताच गावकऱ्यांनी येथे धाव घेतली. मुरबाड पोलिस, अग्निशमन दल व एनडीआरएफची टीम ही घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सुरुवात केली. या वेळी उमेश बोटकुंडले (२१) असे मृतदेह सापडलेल्या तरुणाचे नाव असून कार्तिक गडगे (वय १५ वर्षे) याचा शोध सुरू होता.पाऊस आणी रात्र झाल्याने शोध कार्यास अडथळा आला होता म्हणून शुक्रवारी पुन्हा धबधब्याच्या ठिकाणी शोध मोहीम घेतली असता संध्याकाळी धबधब्याच्या भोवऱ्यात अडकलेल्या कार्तिक या तरुणाच्या मृतदेहास बाहेर काढण्यात आले. यावेळी शहापुर येथील जिवरक्षक टिमचे समिर चौधरी, मुकुंद भगत, विजय भोसले, अमोल कदम, हनीफ करजीकर यांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आणि कार्तिक गडगे याचा म्रुतदेह नातेवाईकांच्या हाती लाभला.

No comments:
Post a Comment