Monday, 10 August 2020

टिटवाळ्यात वीजबिल भरणा केंद्रात सोशलडिस्टींगशनचे तीन तेरा, काही काळ तणाव पोलीस आल्याने परिस्थिती आटोक्यात!

टिटवाळ्यात वीजबिल भरणा केंद्रात सोशलडिस्टींगशनचे तीन तेरा, काही काळ तणाव पोलीस आल्याने परिस्थिती आटोक्यात!


कल्याण (संजय कांबळे) : टिटवाळा आणि मांडा यांच्या मध्ये असलेल्या वीजबिल भरणा केंद्राचे समोर आज सकाळी बील भरणाऱ्याची तूफान गर्दी झाल्याने येथे सोशलडिस्टींगशन चे अक्षरशः तीन तेरा झाले. यामुळे येथे मोठय़ा प्रमाणात राडा होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अखेर वेळीच पोलिसांना पाचारण केल्याने परिस्थिती निवळली व भरणा केंद्र पुन्हा सुरू झाले. तथापि प्रत्येक गावाच्या ठिकाणी टिडीसी बॅकेत वीजबिल स्वीकारले जाते. नागरिकांनी त्याचाही लाभ घ्यावा असे आवाहन विद्युत मंडळांच्या अधिका-यानी केले आहे.
लाॅकडाऊण लागू करण्यात आले. आणि त्यानंतर तीन ते चार महिन्यांनंतर विद्युत मंडळाने नांगरिकाना वाढीव बिलाचा जबरदस्त झटका दिला. या विरोधात राज्यात संतापाची लाट उसळली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह भाजपाने या विरोधात अंदोलन केले. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वाढलेल्या बिलाचे समर्थन करीत ते भरावेच लागेल असा धक्का दिला. यातही थोडासा दिलासा म्हणून हे वाढीव बील टप्प्या टप्प्यात भरण्याचा दिलासा दिला यामुळे आज टिटवाळा आणि मांडा यांच्या मध्ये असलेल्या डिजेवन शोरूम येथील वीजबिल केंद्राचे समोर विजबील भरणाऱ्याची तूफान गर्दी जमा झाली. यामध्ये काहीच्या तक्रारी ही होत्या. त्यातच येथे काही कर्मचारी उपस्थित नसल्याने वातावरण अधिक तापले यामुळे येथे सोशलडिस्टींगशन चे बारा वाजले होते. परिस्थिती हाताबाहेर जात आहे असे लक्षात येताच. विद्युत मंडळांच्या कर्मचारी व अधिकारी यांनी पोलिसांना पाचारण केले. तोपर्यंत येथे मोठा राडा होतोकी काय असे वाटत होते. कारण दोन ते तीन दिवसापूर्वी येथील वाॅचमनला जबर मारहाण झाली होती. त्यामुळे पोलीसही तात्काळ आले व लाईन सुरळीत केली. यांनतर वीजबिल भरणा कांऊटर सुरू झाले.
दरम्यान या बाबतीत अधिक माहिती घेतली असता असे कळले की गोवेली आणि खडवली येथील बील कांऊटर बंद आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिक देखील टिटवाळा येथे येतात. पण विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले खडवली म्हारळ, गोवेली आदी ठिकाणच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विजबील स्विकारले जाते. त्यामुळे नागरिकांनी सोशलडिस्टींग चे पालन करुन याचा लाभ घ्यावा. परंतू येथे वेळ अधिक लागत असल्याने तसेच आॅफिस ला जाणाऱ्या कर्मचारी व इतर लोकांना टिटवाळा हे  सोयीचे वाटत असल्याने येथे तोबा गर्दी झाली होती..
परंतु नागरिकांनीही थोडा संयम ठेवायला हवा कारण टिटवाळा येथे कोरोनोचा हाॅसस्पाॅट झाला होता. त्यातच आपल्या कृतीमुळे अजून भर पडायला नको. तसेच विद्यूत मंडळांच्या अधिका-यानी देखील गर्दीतच्या ठिकाणी जादा कर्मचारी नियुक्त करून ग्राहकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. 

No comments:

Post a Comment

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!!

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!! उरण दि २, (विठ्ठल...