कल्याण पंचायत समितीची पहिल्यांदाच संरचनात्मक दुरुस्ती, इमारतीचे आयुष्य वाढणार!
कल्याण (संजय कांबळे) : जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यातील दुवा व तालुक्याचे विकास केंद्र म्हणून ओळखले जाणा-या कल्याण पंचायत समितीच्या इमारतीची पहिल्यांदा संरचनात्मक दुरुस्ती करण्यात येणार असून त्यामुळे इमारतीचे आयुष्य वाढणार असून भाड्यापोटी द्यावे लागणारे सुमारे पाच लाख रुपये यामुळे वाचणार आहे.
कल्याण तालुक्यात कल्याण पंचायत समितीला अन्यण्यसाधारण महत्त्व आहे. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यातील दुवा म्हणून पंचायत समितीकडे पाहिले जाते. जिल्हा परिषदेच्या व शासनाच्या विविध योजना योग्य प्रकारे राबविण्यात येतात की नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम पंचायत समिती करते. त्यातच कल्याण पंचायत समिती मध्ये शहरी व ग्रामीण अशा भागाचा समावेश असल्याने या समितीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतू कल्याण पंचायत समितीची जुनी इमारत कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने धोकादायक घोषित केली आहे. सन 1962 ला या इमारतीचे उद्घाटन झाले होते. या इमारतीच्या तळमजल्यावर गटविकास अधिकारी दालन, सामान्य प्रशासन, स्वर्ण जंयती ग्राम रोजगार योजना, लेखा विभाग, ग्राम, शिक्षण, खादी, आरोग्य, अभिलेख कक्ष तर पहिल्या माळ्यावर सभापती उपसभापती दालन, बांधकाम, पाठबंधारे, पाणी पुरवठा, सभागृह, पशुसंवर्धन आणि बालविकास प्रकल्प अधिकारी विभागाचे कामकाज चालू होते. पण हे सर्व विभाग आता बचत भवन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे व धोकादायक इमारत खाली केली आहे.
तथापि नवीन इमारतीला गळती लागली असल्याने या इमारतीचे प्लास्टर पडणे, तडे जाणे, असे प्रकार वारंवार घडत असल्याने यावर अद्याप किरकोळ दुरुस्ती पोटी लाखोंचा खर्च करण्यात आला होता. तसे पाहिले तर बचत भवन ही इमारत शुक्रवार दि 20/4/1984 पासून वापरात आली आहे. माझी महसूल मंत्री कै शांताराम घोलप यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले होते तर आमदार नकुल पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या इमारतीला सुमारे 36ते 40 वर्षे होत आहेत. परंतु सध्याची परिस्थिती पाहिली तर ही इमारत धोकादायक आहे की काय असा प्रश्न पडतो.
वारंवार पडणा-या प्लास्टरमुळे अधिकारी व कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत आहेत. त्यामुळे याचे स्थलांतर करावे असे प्रस्ताव पुढे आले. गोवेली की कल्याण असे घोडे आडले तर भाडेतत्त्वावर घेण्यासाठी काही इमारती शोधण्याचा प्रयत्न झाला. याचे भाडे महिना 5लाख रुपये ऐवढी मागणी झाली. अखेर लोकप्रतिनिधी, अधिकारी व पत्रकार यांनी सततच्या प्रयत्नातून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब भी नेमाणे यांनी कल्याण पंचायत समितीच्या दुरुस्तीसाठी भरीव निधी मंजूर केला.
कल्याण पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता एस आर चव्हाण यांनी तात्पुरता उपाय न करता कायमस्वरूपी गळतीचे दुखणे दुर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता कल्याण पंचायत समितीच्या इमारतीची दुरुस्ती ही संरचनात्मक करण्यास सुरुवात केली. यामध्ये संपूर्ण इमारतीचा लोड पेलत असलेल्या बिम काॅलम आणि सप्लायर दुरुस्ती हाती घेतली. यामध्ये बिमचे मायक्रो क्राॅक्रीटिकरन तर स्लाबला पाॅलीमर स्ट्रीटमेंन्ट सुरू केली आहे. या सर्वास कारणीभूत असलेली पाणी गळती रोखण्यासाठी गळतीप्रतिबंधक कामे यामध्ये शेड, भिंतींचा ओलावा काढण्यासाठी बाहेरचे प्लास्टर काढून पुन्हा प्लास्टर दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामुळे इमारतीचे आयुष्य तर वाढणार आहेच. शिवाय भाड्यापोटी भरावे लागणारे 5 लाख रुपयांची बचत झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे आता कल्याण पंचायत समितीचे रुपडे पालठणार असे वाटते. तर या संरचनात्मक दुरुस्तीमुळे गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.


No comments:
Post a Comment