वृद्ध नागरिकांसाठी घाटकोपर येथे खुर्चीचे वितरण !
मुंबई (शांत्ताराम गुडेकर) :
ईशान्य मुंबईतील घाटकोपर पश्चिम जय महाराष्ट्र प्रगती मंडळातील तसेच परिसरातील वृद्ध नागरिकांना आसन(खुर्ची)चे समाजसेवक जयेश पारेख यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी तरुण शर्मा , दीपक साळवी , दशरथ सांगळे आदी उपस्थित होते. दिवाळी निमित्त मंडळातील ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था व्हावी यासाठी तसेच वृद्ध नागरिक फेरफटका मारण्यासाठी घरा बाहेर पडतात त्यांना बसण्याचे साधन उपलब्द व्हावे अशी काही ज्येष्ठ नागरिकांनी मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत समाजसेवक जयेश पारेख यांनी आपल्या स्वनिधीतुन नागरिकांना खुर्ची वाटप केल्याचे मंडळ कार्यकर्ता मंगेश जंत्रे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment