Thursday, 10 December 2020

कल्याण तालुक्याची जीवन वाहिनी पुन्हा एकदा जलपर्णी च्या विळख्यात ? वाढत्या प्रदूषणाची लक्षणे !

कल्याण तालुक्याची जीवन वाहिनी पुन्हा एकदा जलपर्णी च्या विळख्यात ? वाढत्या प्रदूषणाची लक्षणे !


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर,  कल्याण डोंबिवली महानगर पालिका आदी शहरी भागातील नागरिकांची तहान भागविणारी उल्हास नदी पुन्हा एकदा जलपर्णी च्या विळख्यात सापडत असून ही जलपर्णी म्हणजे वाढत्या प्रदूषणाची लक्षणे मानली जात आहे. त्यामुळे कोरोनोच्या महामारीततून वाचलेल्या लोकांना आता दूषित पाण्याला व त्यापासून होणाऱ्या आजारांना सामोरे जावे लागणार असे दिसते. 


कल्याण तालुक्यात उल्हास, बारवी, काळू आणि भातसा या चार बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. यातील उल्हास नदीच्या पाण्यावर कल्याण तालुक्यातील शेकडो ग्रामपंचायती व विविध महानगर पालिका अंवलबून आहेत मागील काही वर्षांपूर्वी उल्हास नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी उगवली होती. नदीचे पात्र आहे की हिरवागार गालिचा  हे समजत नव्हतं. या जलपर्णी मुळे अनेक जलचर प्राणी आॅक्शिजन अभावी मरत होते या मागील शोध घेतला असता या जलपर्णी दूषित पाण्यामुळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते. बदलापूर, कर्जत, अंबरनाथ, आणि पुढे कल्याण येथे फार्महाऊसव, तबेले, शहरांचे सांडपाणी, ड्रेनेज लाईन, यांचे प्रक्रिया न केलेले पाणी सरळ नदीपात्रात येत असल्याने जलपर्णी वाढत होती. 
त्यामुळे या विरोधात उल्हास नदी बचाव कृती समिती व इतर अनेक सामाजिक संघटना यांनी उल्हास नदीच्या वाढत्या प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक उपक्रम राबविले शिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी दाखल केल्या. ऐवढ्या वरच न थांबता सामाजिक जाणीवेतून जलपर्णी नदी पात्राबाहेर काढण्याचे काम देखील केलेले होते. त्यामुळे काही काळ तरी ही नदी स्वच्छ झाली होती. 
कोरोनाच्या ७/८ महिन्याच्या कालावधीत सर्व कामे व व्यवहार बंद असल्याने नदी प्रदूषण मुक्त झाली होती. नदीपात्रात कोठेही जलपर्णी दिसत नव्हती पण लाॅकडाऊण शिथिल झाले आणि सर्व व्यवहार सुरू झाले तसे पाणी दूषित व्हायला सुरुवात झाली. याचाच एक भाग म्हणून शहाड पाणी उपसा पंपाजवळ जलपर्णी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा उल्हास नदी बचाव कृती समितीच्या सदस्यांना जलपर्णी काढण्याचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे.? परंतु हे योग्य आहे का कारण प्रत्येक नागरीकांची जबाबदारी नाही का? एका बाजूला केंद्र सरकार 'हर घर नलसे जल, ही महत्त्वाकांक्षी योजना लागू करत आहे. पण शुद्ध पाण्याचे काय? 
नदीच्या पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाचे काय? ते कसे रोखणार? ग्रामपंचायतीचे हद्दीत देखील जिन्स कारखान्याचे पाणी डायरेक्ट नदीच्या पात्रात  सोडले जाते हे कोण रोखणार? या सर्व गोष्टींचा आताच विचार करून यावर उपाय शोधला पाहिजे, अन्यथा कोरोनोच्या महामारीततून वाचला पण दूषित पाण्यामुळे होणारे विविध प्रकारचे साथीचे आजारांचे काय? याचा ज्यांचा त्यांनी विचार करावा !

No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...