प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन !
"आडीवली, ढोकळी आणि पिसवली परीसरातील नागरिकांच्या सुटल्या समस्या"
कल्याण (संजय कांबळे)
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात समस्यांचे डोंगर उभे राहिले होते. अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील हे नेहमी शासन दरबारी आपल्या प्रभागातील समस्याला मांडत आले आहेत. कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांनी आडिवली, ढोकळी आणि मतदारसंघातील नागरिकांच्या समस्यां सोडवण्यासाठी सतत पाठपुरावे केले होते. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून २७ गावातील या प्रभागांमध्ये जलवाहिन्या आणि रस्त्याची कामे तसेच दिवाबत्तीच्या कामांचे भूमिपूजन महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात असलेल्या आणि २७ गावांमध्ये असलेल्या आडिवली, ढोकळी आणि मतदार संघातील पिसवली भागात नागरी समस्यां सोडवण्यासाठी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील हे नेहमी काम करत राहिले आहेत. नागरिकांना कोणत्याही अडचणी असो किंवा समस्यां सोबत तातडीने सोडवण्यासाठी नगरसेवक कुणाल पाटील हे प्रयत्नशील असतात. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून एमएमआरडीए आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातूक मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. नेताजी नगर ते आडिवली गावापर्यंत १६० मी.मी. जलवाहिनी हि ७०० मीटर जलवाहिनी, एमआयडीसी टॅपिंग पासून ते आडिवली तलाव रोड पासून ते श्री दत्त मंदिरापर्यंत २०० मी.मी. व्यासाची जलवाहिनी हि १००० मीटर टाकण्यात येणार आहे. तर जय मल्हार नगर, ममता नगर, जय भिम नगर तसेच मतदार संघातील पिसवली परिसरातील नागरिकांसाठी २५ सिट्सचे प्रसाधन गृहांसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून भूमिपूजन झालेल्या कामांची तातडीने कामे सुरु करण्यात आली आहेत. या वेळी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे, नगरसेवक कुणाल पाटील, समाजसेवक अनिल पाटील महेंद्र भाऊ तरे, मा. परिवहन सदस्य पांडुरंग चव्हाण, मा. उपसरपंच केशव भाने, किशोर शेठ भाने, प्रभाकर भाने, मनोज भाने, शरद पवार, शिवसागर यादव, नकुल नाना भौईर, गोविंद भोईर, कल्पेश भोईर, रोशन भोईर, अशोक भोईर, नंदू भाने, चेतन पाटील, मनोज गायकवाड, किशोर म्हात्रे, राजेंद्र भाने, रामदास फुलोरे, जगदीश फुलोरे यांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रभागापुरता न राहता जनतेची सेवा हि समस्या सोडवण्यासाठी कल्याण डोंबिवली शहरात देखील हाकेला धावणारे नगरसेवक कुणाल पाटील यांचे गायक आनंद शिंदे यांनी कौतुक केले आहे. ज्या कल्याण भूमीमधून मी राज्यभरात पोहचलो मात्र माझ्या मित्राच्या मुलाने केलेल्या विकासकामांचे भूमिपूजन करण्याचे मला भाग्य मिळाले असल्याचे गायक आनंद शिंदे यांनी सांगितले आहे. तर जनतेच्या विश्वासाला कोणत्याही प्रकारे तडा जाऊ देणार नाही. जनतेसाठी नेहमी नेत्यासारखा नाही, तर कार्यकर्त्यासारखा मदतीला गेलो आहे. त्यामुळे जनतेची सेवा अशीच अविरतपणे करणार असल्याचे कुणाल पाटील यांनी सांगितले आहे.


No comments:
Post a Comment