Saturday, 12 December 2020

भिवंडी शहरातील चहा ची तल्लप असणाऱ्यांसाठी चहा मैफिल चे मा.आमदार रुपेश म्हात्रे याच्या हस्ते उद्घाटन !

भिवंडी शहरातील चहा ची तल्लप असणाऱ्यांसाठी चहा मैफिल चे मा.आमदार रुपेश म्हात्रे याच्या हस्ते उद्घाटन !


बातमी :- मोनिश गायकवाड 

भिवंडी ( दि.11 डिसेंबर ) भिवंडी शहरातील नवउद्योजक यांनी आपल्या कौशलतेच्या जोरावर शहरात प्रसिद्ध चहा मैफिल या नवीन दुकानाच्या पहिल्या शाखेचे उदघाटन 
मा.आमदार रुपेश म्हात्रे याच्या हस्ते करण्यात आले. भिवंडी शहरात चहाचे दुकान दिवसेंदिवस नवनवीन ब्रॅंडचे सुरू होत असताना शहरातील नवं युवक उधोजक यांनी भिवंडी शहरातील उपजिल्हा रुग्णालय इंदिरा गांधी च्या गेट समोर केले आहे. या नव उधोजकांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या गुणवत्तापूर्ण कामगिरी ने या चहाच्या व्यवसायात आपले नाव रोवले आहे तर आता यांनी चहाच्या व्यवसायात चांगले नाव केले आहे आता त्यांनी चहा सोडून इतर व्यवसायातही नाव उंचावले पाहीजे असें शुभेच्छा देताना माजी आमदार  रुपेश म्हात्रे यांनी केले आहे.तर आमच्या ग्राहकांना आम्ही एका चांगल्या प्रकारच्या चहाची चव आमच्या चहा मैफिल या नावाने केली आहे.यावेळी उदघाटक माजी आमदार रुपेश म्हात्रे,गोरखनाथ म्हात्रे,मगन चौधरी,इंद्रपाल दिवेकर,उद्योगपती तुषार गणेश चौधरी,जुगल छत्रपती दिवेकर ( शाखाप्रमुख शिवसेना ) उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...