सुप्रीमो शरद पवार यांच्या व्हर्च्युअल अभिष्टचिंतन कार्यक्रमात भिवंडीत असंख्य कार्यकर्ते महिला सहभागी...
बातमी :- मोनिश गायकवाड
भिवंडी ( दि.12 डिसेंबर ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 वा वाढदिवस कोरोना संक्रमण काळ असल्याने व्हर्च्युअल अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
ह्या मध्ये महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्ते सहभागी होत असताना भिवंडी शहरातील पाटीदार सभागृह या ठिकाणी शहराध्यक्ष भगवान टावरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते विशेषतः महिला उपस्थित झाल्या होत्या.
या कार्यक्रम दरम्यान शहरातील महाविकास आघाडी मधील पक्षाच्या लोकप्रतिनिधीं यांना ही आमंत्रित करण्यात आले होते ,सर्वांच्या उपस्थितीत केक कापुन कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला .


No comments:
Post a Comment