Saturday, 12 December 2020

केंद्र सरकारच्या भरमसाठ पेट्रोल-डिझेल दरवाढ व रावसाहेब दानवे यांच्या बेताळ वक्तव्या निषेधार्थ मुरबाड मध्ये शिवसेनेचा रास्ता रोको !!

केंद्र सरकारच्या भरमसाठ पेट्रोल-डिझेल दरवाढ व रावसाहेब दानवे यांच्या बेताळ वक्तव्या निषेधार्थ मुरबाड मध्ये शिवसेनेचा रास्ता रोको !!


मुरबाड : (मंगल डोंगरे ) केंद्र सरकारने केलेल्या भरमसाठ पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या व रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यां बाबत केलेल्या बेताळ वक्तव्याच्या निषेधार्थ आज मुरबाड तिनहात नाका येथे घोषणा बाजी करत रास्ता रोको करण्यात आला.
            कोरोना संकटाच्या तावडीतून भरडून निघालेली सर्वसामान्य जनता कसबसं जिव जगण्याचा प्रयत्न करीत असताना अस्मानी सुलतानी संकटानी हाती आलेले भातपिक काढुन घेतलं. त्यात जगण्याच्या विवंचनेत असताना केंद्र सरकारने नवीन भरमसाठ पेट्रोल -डिझेल दरवाढ करून सर्वसामान्य जनतेच कंबरड मोडून काढले. केंद्र सरकार एवढ्यावरच थांबले नाही .तर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या विरोधात जुलमी कायदे केले. याशिवाय भाजपच्या रावसाहेब दानवे यांनी  प्रसार माध्यमांसमोर बेताळ वक्तव्य करून  शेतकऱ्यांची टिंगलटवाळी केली. या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलने करण्यात आली. त्याचाच एक भाग  म्हणून मुरबाड तिनहात नाका येथे शिवसेनेने कल्याण -नगर महामार्ग अडवून रास्ता रोको करून निषेध व्यक्त केला.
          यावेळी शिवसेनेचे विधान सभ क्षेत्र संघटक मधुकर (आप्पा) घुडे तालुका प्रमुख कांतीलाल कंटे ' मुरबाड शहर प्रमुख रामभाऊ दुधाळे ''शिवसेना समन्वयक रामभाऊ दळवी 'जि.प.सदस्या प्राजक्ता भावार्थे 'खरेदी -विक्री संघाचे चेअरमन प्रकाश पवार सर 'शिवसेना महिला आघाडी प्रमुख उर्मिला लाटे 'समाज सेवक मोहन भावार्थे  ' संतोष विशे यांसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.याप्रसंगी चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे रास्ता रोको शांततेत पार पडला.

No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...