रायते येथील उल्हास नदीत आढळला मृतदेह, वारंवारच्या प्रकाराने पोलीसांना त्रास ?
कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील रायते येथील उल्हास नदीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला असून येथे वारंवार असे प्रकार घडत असल्याने पोलिसांना याचा त्रास होत आहे. तरीही पोलीसांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणीसाठी तो रुग्णालयात पाठवला आहे.
तालुक्यातील रायते हे गाव उल्हास नदीच्या काठावर वसले आहे. येथे नदिचा प्रवाह संथ असल्याने येथे अनेक पर्यटक पाण्यात पोहण्यासाठी येतात. तसेच येथे मद्यपी देखील मोठ्या प्रमाणात येतात व पार्ट्या करतात. स्थानिक ग्रामस्थ व पोलीस वेळोवेळी यांना हाकलून देतात पण त्यांची नजरचूकवून पुन्हा येथे असे प्रकार चालू असतात. आतापर्यंत येथे कित्येकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
नुकताच येथे साधारण पणे 40/45 वयाच्या इसमाचा पाण्यात तरंगताना मृतदेह आढळून आला. ही खबर कल्याण तालुका पोलीस ठाण्याला समजताच पोलीस घटनास्थळी येऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सदरचा मृतदेह हा दोन दिवसांपूर्वी चा असून हा घातपात आहे की काय याचा तपास कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली गोवेली पोलीस चौकीचे इन्स्पेक्टर प्रदीप अरोटे हे करित आहे.
No comments:
Post a Comment