शिवसेना वहाळ विभागातर्फे डॉ.पराग पावरी यांचा "कोरोना योद्धा" म्हणून गौरव !!
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर/दिपक कारकर) :
जगावर असणारे कोरोनाचे संकट या कोविड - १९ च्या दिवसांत अनेकांना आर्थिक परिस्थितीचा संघर्ष करावा लागला. अजूनही या विषाणू वरती लस उपलब्ध झालेली नाही. या काळात सर्वसामान्य जनतेला मोठी झळ बसली. यासाठी देवदूत म्हणून सेवा करणारे डॉक्टर यांचे मोठे योगदान आहे. गुहागर - कुडली गावचे सुपुत्र मात्र चिपळूण तालुक्यातील आबीटगाव येथे आपला लहानसा वैद्यकीय दवाखाना असून गेली अनेक वर्षे रुग्णांची सेवा करणारे डॉ. पराग पावरी (बी.ए.एम.एस) यांनी कोरोनाच्या काळात आपला दवाखाना नियमित चालू ठेऊन सर्व रुग्णांना उपचार देत प्रामाणिकपणे सेवा केली. या कार्याची दखल म्हणून शिवसेना वहाळ विभाग तर्फे "कोरोना योद्धा" म्हणून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान विभाग प्रमुख - राजू दळवी, शाखा प्रमुख - शांताराम कुंभार, तसेच शिवसैनिक जयराम पवार, संतोष घडशी, अजित मोरे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment