Thursday, 10 December 2020

भिवंडी शहर विकासाकडे "आमदार रईस शेख" यांनी वेधले मनपा आयुक्तांचे लक्ष !!

भिवंडी शहर विकासाकडे "आमदार रईस शेख" यांनी वेधले मनपा आयुक्तांचे लक्ष !!


"मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिले आश्वासन"

भिवंडी, मोनिश गायकवाड : भिवंडीत होणारी वाहतूक कोंडी, रस्त्यांची समस्या, पिण्याचे पाणी तसेच सार्वजनिक शौचालय देखभाल दुरुस्ती समस्या, रिंग रोड कामाबाबतची समस्या, अनधिकृत बांधकाम व रस्त्यांवरील अतिक्रमणे, गटार व्यवस्थापन या व अशा अनेक शहर विकासासंदर्भातील मुद्यांकडे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी भिवंडी मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांचे लक्ष वेधले. बुधवारी मनपा आयुक्त डॉ आशिया यांच्या कार्यालयात यासंदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार शेख यांनी शहर विकासाबाबत विविध १८ मुद्यांवर आयुक्तांशी चर्चा केली व हे मुद्दे व समस्या सोडविण्यासाठी मनपा आयुक्तांना विनंती केली. 

             भिवंडी शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या रिंग रोडचे काम निधी असूनही बंद असल्याने या कामाबाबत आमदार रईस शेख यांनी आयुक्तांशी चर्चा करून सदरच्या रिंग रोडच्या कामातील अडथळे दूर करून लवकरात लवकर रिंग रोडचे काम सुरु करण्याच्या सूचना आमदार शेख यांनी यावेळी दिल्या. त्याचबरोबर शांतीनगर, फातिमानगर येथील रस्त्यांवर असलेले अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या देखील सूचना आमदार शेख यांनी केल्या असून शहरातील काँक्रेट रस्त्यांच्या बाजूला बसविण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामांमध्ये झालेल्या हलगर्जी कारभारामुळे शहरात अनेक ठिकाणी अपघात होत असून या सर्व कामांची पाहणी करण्यात यावी, शहरातील अंतर्गत ड्रेनेज लाईनच्या कामांना गती द्यावी व कामाची गुणवत्ता तपासणी करावी, शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी शांतीनगर येथे तानसा पाईप लाईन जवळ जल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात यावा तसेच या भागात असलेल्या ६ इंच पाईप लाईन बदलून त्या ठिकाणी १२ इंचाच्या पाईप लाईन जोडणी करावी जेणेकरून परिसरातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होईल त्याच बरोबर या पाईप लाईनवर होणारी पाणी चोरी देखील थांबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच मौलाना आझाद रोडचे नामकरण भारतरत्न डॉ मौलाना आझाद असे करणे, शालेय शिक्षण स्तर वाढविण्यासाठी मनपा प्रशासनाने विशेष प्रयत्न करणे तसेच शांतीनगर पाईप लाईन ते भादवड असा पाईप लाईनवर उड्डाणपूल बांधणे अशा विविध सूचना या बैठकीत आमदार रईस शेख यांनी मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांच्याकडे केल्या असून शक्यत्या सूचना व समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्यात येईल असे आश्वासन यावेळी मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी आपल्याला दिले असल्याची प्रतिक्रिया आमदार रईस शेख यांनी दिली आहे.      

No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...