Thursday, 10 December 2020

भिवंडी महानगरपालिका हद्दीतील वराल देवी उद्यान भस्म अवस्थेत !

भिवंडी महानगरपालिका हद्दीतील वराल देवी उद्यान भस्म अवस्थेत !


भिवंडी, मोनिश गायकवाड : भिवंडी महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या वरालदेवी उद्यानाची दुरावस्था खूप वाईट झाली आहे उद्यानाच्या संरक्षक भिंती या संपूर्णपणे निकृष्ट झाले असून त्या ठिकाणी भेगा पडल्या आहेत व काही मोडकळीस आले आहेत तर उद्यानामधील सुशोभीकरण केलेल्या अनेक झाडच नाही आहेत तसेच उद्यानांमध्ये संपूर्ण रस्ता हा उखडला असून यामध्ये असणाऱ्या आसनव्यवस्था सुद्धा तुटलेले आहेत. भिवंडी शहराची लोकसंख्या लाखोंच्या घरात असतानासुद्धा महानगरपालिकेकडे उद्यानासाठी च्या सुशोभीकरना साठी केला जाणारा निधी उपलब्ध नाही का ? व या उद्यानात लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कोणी खेळायला येतं तर कोणी मॉर्निंग वॉकसाठी या उद्यानाची दुरावस्था पाहिल्यावर महानगरपालिकेच्या उद्यान व्यवस्थेवर कीव वाटावी असेच चित्र दिसून येते उद्यानाच्या गेट सुद्धा तुटलेला असून यामध्ये लाखो रुपये खर्च करून दगडी बांधकाम करण्यात आले होतं हे बांधकाम हे आता तुटल्याचा दिसून येत आहे स्थानिक नगरसेवकांकडून व महानगरपालिकेकडून या उद्यानाची दुरावस्था लक्षात येत नाही असेच काही चित्र या ठिकाणी दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...