माणगांव तालुका कृषी विभाग मार्फत तालुक्यात सर्वत्र जागतिक मृदा दिन विविध उपक्रमांनी साजरा !
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : माणगाव तालुक्यात आज दिनांक पाच डिसेंबर चे औचित्य साधून ग्राम स्तरावर विविध गावांमध्ये जागतिक मृदा आरोग्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शेतकऱ्यांना जमिनीची आरोग्य, खतांचा संतुलित वापर, आरोग्य तपासणी, नमुना काढणे इत्यादी. बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रत्येक देशाची मृदा ही सर्वात महत्वाची नैसर्गिक संपत्ती आहे, आणि महत्वाचे म्हणजे शेतीमध्ये जमिनीस अनन्यसाधारण महत्त्व आहे, परंतु रासायनिक खतांचा असंतुलित वापर, सेंद्रिय खताचा अभाव व पाण्याचे अनियमित वापरामुळे शेतीची आरोग्य धोक्यात येत आहे . त्यामुळे जमीन नापीक होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच उत्पादनात घट जाणवत आहे . त्यामुळे पुढील काळात मृदा तपासणी व त्यावर आधारित खताचे नियोजन, सेंद्रिय खताचा वापर त एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे याबाबत तालुका कृषी माणगाव यांच्यामार्फत क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्या मार्फत 13 गावांमध्ये शेतकरी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले, यामध्ये शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य संभाळण्यासाठी मृदा आरोग्य पत्रिका आधारित खताचे नियोजन, सेंद्रिय खताचा वापर, जमिनीचा नमुना काढणे या बाबत तालुका कृषी अधिकारी श्री. रवींद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री किरण पडवळकर, मंडळ कृषी अधिकारी गोरेगांव, श्री संजय ससाणे, श्री राजाराम शिंदे, आणि माणगांव तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून शेतकर्यांना जागतिक मृदा दिना निमित्त शेती पूरक सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले .
माणगाव तालुक्यात प्रामुख्याने खरीप हंगामात भात व नागली भात व नागली व रब्बी हंगामात वाल पावटा भाजीपाला हरभरा इत्यादी पिके घेतली तालुक्यातील जमिनीमध्ये सर्वसाधारणपणे मध्यम प्रमाणात नत्र स्फुरद पालाश चे प्रमाण असून शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार खताचा व सेंद्रिय खताचा वापर करावा व वेळोवेळी आपल्या जमीनीची आरोग्य परीक्षण करून घेण्यात यावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी माणगाव श्री रवींद्र पवार यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment