Sunday, 6 December 2020

ओबीसींची जोपर्यंत जात जातनिहाय जनगणना होत नाही तो पर्यंत माघार नाही !

ओबीसींची जोपर्यंत जात जातनिहाय जनगणना होत नाही तो पर्यंत माघार नाही !            
'ओबीसी संघर्ष समितीचा निर्धार' !!


मुरबाड- (मंगल डोंगरे) :ओबीसी  समाजाची 2021 ला ओबीसी स्वतंत्र  जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अन्यथा पुढील येणारी जनगणना आम्ही करणार नाहीत येणाऱ्या जणगणनेवर बहिष्कार घातला जाईल. असा इशारा राज्य शासनाला दिला असून राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसींची जनगणना ही झालीच पाहिजे ओबीसींची जनगणना ही जाणीव पूर्वक करत नसल्याचे समोर येत असल्याने आत्ता ओबीसींची जोपर्यंत जात जातनिहाय जनगणना होत नाही तो पर्यंत माघार नाही मुरबाड तालुक्यातील विविध गाव पाड्यांमधे ओबीसी जनजागृती मोहीम राबवून महत्व पटवून देण्यात आले मुरबाड, शहापूर तालुक्यात तब्बल 79 सभा करण्यात आल्या.

    
     ओबीसी संघर्ष समन्वय समिती यांच्या वतीने मुरबाड तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी आरक्षण जनजागृती सभा म्हसोबा देवस्थान हॉल म्हसा येथे आयोजन केले होते या वेळी युवा प्रभोधनकार सचिव ओबीसी समिती रायगड रोशन पाटील यांनी ओबीसी संदर्भात महत्व पटवून दिले. या वेळी कुणबी समाज उन्नती मंडळाचे  मुरबाड तालुका अध्यक्ष शांताराम बांगर, पंचायत समिती सभापती श्रीकांत धुमाळ, सरचिटणीस प्रकाश पवार, माजी पंचायत समिती सदस्य परशराम भोईर, जिल्हापरिषद सदस्य रेखा कंटे, शिवसेना तालुका प्रमुख कांतीलाल कंटे, आप्पा घुडे, शिव व्याख्याते जयश्री धळपे, रामभाऊ दळवी, तालुका ओबीसी संघर्ष समिती मुरबाड संघटक उमेश पाटील यांच्यासह तालुक्यातील जनसमुदाय मोठया संख्येने उपस्थित होता.

No comments:

Post a Comment

दैनिक युवक आधारच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !

दैनिक युवक आधारच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न ! पनवेल, (केतन भोज) : दैनिक युवक आधारच्या पहिल्या वर्षाच्य...