Sunday, 6 December 2020

अभिनेते रवि पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले !! 🙏 रवि पटवर्धन यांच्या सोबतची एक आठवण 🙏

अभिनेते रवि पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले !!

🙏 रवि पटवर्धन यांच्या सोबतची एक आठवण 🙏



पांडुरंग कुंभार, सहकलाकार  : सन २००१ सुमारास, मी नाटकांत भुमिका तसेच नेपथ्य आणि प्रकाश योजना करत असे.
एक दिवस अचानक कल्याण येथील प्रसिद्ध चित्रपट कला दिग्दर्शक अनिल शहाणे सरांनी मला बोलावून घेतले व सांगितले की एका नाटकांसाठी कलाकाराची गरज आहे, भूमिका लहान आहे, पण महत्वाची आहे, पुढील ७ दिवसांनंतर प्रयोग आहे, तू ठाण्याला जाऊन परूळेकरांना भेट, मी थेट ठाणे गाठले, 
हातात स्क्रीप्ट आल्यावर कळाले जी भुमिका मला करायची होती ती लहान नव्हती, नाटकाचा पडदा ऊघडल्या पासून पडदा पडेपर्यन्त मला स्टेजवर पात्र रंगवायचे होते, घामच फुटला, सात दिवस व शेकडो संवाद !


"त्यात माझ्या समोर रवि पटवर्धन सर"

मी पळ काढण्याच्या प्रयत्नात होतो पण परूळेकरांनी आत्मविश्वास वाढवला, रवि पटवर्धन सहसा तालमीला येत नसत, ते घरीच स्क्रिप्ट वाचत, कारण त्यांनी या आगोदर या नाटकाचे शेकडो प्रयोग केले होते त्यामुळे संहीता त्यांना माहीत होती, पण माझं काय ? तालीम व घोकंपट्टी सुरू होती, रवि पटवर्धन यांच्या जागी परूळेकर तालीम रंगवत होते पण प्रयोगाला मात्र रवि पटवर्धन बाबा भुमिकेत असणार होते. 
मी परूळेकर यांना विनंती केली की रवि बाबां सोबत एक तरी रंगीत तालीम द्या नाहीतर मी ऐनवेळी रंगमंचावर फापलनार.


शेवटी तो दिवस उजाडला, प्रयोगाचा, रवि पटवर्धन 'बाबा' आल्यावर सांगितले, घाबरू नको मी संभाळून घेईन, पण संवाद पाठ आहेत ना ?
मी हो म्हटलं ...
मग काही हरकत नाही असं बाबा आपल्या करड्या आवाजात म्हणाले.
पण खरी गंम्मत पुढे होणार होती.
पडदा उघडला ....... 
माझ्या पोटात जोरात कळ आली..
संवाद तर पाठ आहेत पण, बाबा सोबत एकही रंगीत तालीम न झाल्याने रंगमंचावरील सहज वावर व एकमेकांत सुसंवाद होणारच नव्हता.
विंगेत पोटातली कळ दाबून फक्त सेटकडे पहात होतो, माझ्या मागे अमरदिप सावंत उभा होता त्याने मला स्टेजवर ढकलले, 
........
आणि मी सूरू झालो

बाबां ची एन्ट्री १५ मिनीटांनंतर होती, मी सहज व लाफ्टर घेत घेत  भूमिका रंगवत होतो, दोन ब्लैकाऊट नंतर बाबा स्टेजवर अवतरले  ..
आणी आमच्यात जागा घेण्यावरून द्वंद्व सूरू झाले, कारण कोणत्या संवादाला कोण रंगमंचावरील कोणती जागा घेणार हा प्रश्र्न निर्माण झाला, कारण रंगीत तालीम झाली असती तर हे शक्य झाले असते, 
... मध्यंतर झाला ... 
मेकअप रुम मध्ये बाबा एकदम अंगावर खेकसले, काम चांगलं करतोस पण मधे मधे कशाला येतोस, धड तूही जागा घेत नाहीस व मलाही घेऊन देत नाहीस. मी सांगीतले बाबा रंगीत तालीम व्हायला हवी होती, 

तोवर दुसरा अंक सुरू झाला मग मी बाबा आता कोणती जागा घेणार यांचा अंदाज बांधून मी जागा बदलत काम करत होतो.
एकदा तर जागा घेण्याच्या भानगडीत बाबांच्या पोटाला घासून मी निघालो..
प्रेक्षकांना तो विनोद वाटला व हश्या व टाळ्या कडाडल्या, गंभिर सीन सूरू असतांना विनोद झाला होता ...
बाबाने नंतर नाटक संपल्यावर कान पिळले व सोबत कौतूक देखील केले, कारण केवळ ७ दिवसांत एक मोठ्ठि भूमिका साकारणे कठीण होते. 
या नंतर या नाटकाचे अनेक प्रयोग पार पडले .

🙏🙏🙏
आज केवळ आठवणी आहेत,
रवि पटवर्धन (बाबा) यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो🙏🙏

नाटकाचे नाव *नाथ हा माझा*
लेखक - मधुसूदन कालेलकर
माझी भूमिका - *जावळे* मुनिमजी

पी. बी. कुंभार

No comments:

Post a Comment

पत्रकार पंकजकुमार पाटील यांना 'समाजभूषण' आणि निर्भीड जागल्या हे दोन पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान !!

पत्रकार पंकजकुमार पाटील यांना 'समाजभूषण' आणि निर्भीड जागल्या हे दोन पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान !! मुंबई, प्रतिनिधी : द...