नववर्षाच्या सुरूवातीलाच ए.टि.एम. फोडण्याचा घाट अंगाशी आला..
पोलिसांनी मुसक्या आवळताच चोरी करण्याचा माज उतरला..
ए.टि.एम. फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या चौघांना अटक..
उल्हासनगर (गौतम वाघ) :- संपूर्ण विश्व सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी आनंद व हर्षोल्हासात मशगुल असतांना काही चोर बँकेचे ए.टि.एम. फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणार्या चार जणांच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे प्रकटीकरणाचे पो.उप.नि.हर्षल राजपूत ह्यांच्या पथकांने यश प्राप्त केले.
१ जानेवारी च्या रात्री अडीच वाजेच्या सुमारास विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन च्या हद्दीतील सतरामदास हॉस्पीटल येथील ऍक्सिस बँकेचे ए.टी.एम मध्ये प्रवेश करून सदर ए.टी.एम चे सेप्टी डोर आणि ए.टी.एम पासवर्ड किट तोडून त्या मधून अज्ञात इसमानी पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी ए.टी.एम अधिकारी राजेश बोरकर यांच्या फिर्यादी नुसार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये गु.रजि.नं-१/२०२१ भा.द.वी कलम ३८०,४५७,५११,४२७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.या तक्रारी नुसार बँकेच्या सीसीटीव्ही फुटेज वरुन आसपासच्या परिसरातील फुटेज तपासत त्यांना दोन आरोपी ए.टी.एम बाहेर फिरताना आणि दोन आरोपी ए.टी.एम बाहेर येऊन पळताना दिसले या चार आरोपींची पोलिसांनी लागलीच ओळख पटवली.बातमीदाराने दिलेल्या माहिती च्या आधारे या चौघांना आशेळेगाव परिसरात सापळा रचत २४ तासात चार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे.सागर सूर्यवंशी,आशिष गौर,केशव जगताप,रोहित कहार असे या आरोपीची नावे आहेत.सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता तिन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.गुन्हाचा अधिक तपास पो.शि.निलेश तायडे हे करित आहे.
वरिष्ठ पो.नि.कन्नैया थोरात यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटिकरणाचे पो.उप.नि.हर्षल राजपुत यांच्या नेतृत्वात पोलीस नाईक जितेंद्र चित्ते, निलेश तायडे, रोहिदास बुधवंत,पांडुरंग पथवे,पोलीस शिपाई,वैजनाथ राख, हरेश्वर चव्हाण, हनुमंत सानप,कृपाल शेकडे,गणेश डमाळे, बाबा जाधव, मंगेश वीर ह्यांनी सदरील कामगिरी उत्तमरित्या बजावत आरोपींना २४ तासाच्या आत अटक केल्याने वरिष्ठानी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करत त्याचे मनोबल वाढवुन आंनद व्यक्त केला.

No comments:
Post a Comment