Tuesday, 2 March 2021

गुहागर प्रतिष्ठाणने राबवली जिल्हा परिषद मनवेल पाडा विरार पूर्व येथील शाळेची दुरुस्ती व महास्वच्छता मोहीम !

गुहागर प्रतिष्ठाणने राबवली जिल्हा परिषद मनवेल पाडा विरार पूर्व येथील शाळेची दुरुस्ती व महास्वच्छता मोहीम !


विरार, (शांत्ताराम गुडेकर/ दिपक मांडवकर) :

        कोरोना काळात संपूर्ण जगभरातील शाळा बंद असल्याने खास करून जिल्हापरिषद विद्यालय अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचे निदर्शनास येत आहे. अश्या वेळी पालघर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कर्तव्यशील असलेले गुहागर प्रतिष्ठाणने आपल्या विशिष्ठ कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केली ती म्हणजे, 

      विरार मनवेल पाडा विरार पूर्व येथील जिल्हापरिषद शाळेची पाहणी केली असता मुलींचे स्वच्छतागृह अत्यंत दयनीय अवस्थेत होते. तीन बाथरूमचे दरवाजेच पूर्णतः मोडून पडले होते. त्या वेळी या गुहागर प्रतिष्ठाणने ते तिन्ही दरवाजे नवीन बसवून त्या ठिकाणी पूर्ण रंगरंगोटी करून घेतली. शाळेच्या आवारातील संपूर्ण परिसर स्वच्छ करून प्रत्येक वर्ग आणि परिसरात सॅनिटायझर करून निर्जंतुक करून घेतले. त्या क्षणी गुहागर प्रतिष्ठाणचे विद्यमान अध्यक्ष श्री. योगेश कदम सर यांनी हा उपक्रम राबविण्यात विशेष सहकार्य केले. श्री. मंगेशजी गावकर, रमेश जाधव, भरत गुजर, राजाराम पवार, सुनील हळये, अंकुश पारदळे, गणेश हळये, निलेश धनावडे, अंकुश मुकनाक, प्रभाकर नितोरे, वैभव हळये, विनायक चव्हाण, रवींद्र साळवी, मनोज गावडे, दिलीप हळये, दिलीप मांडवकर, एकनाथ बेंडल, चंद्रकांत भेकरे, अभिजित कदम, योगेश वाडकर या सर्व सहकार्यानी  मोलाचे योगदान दिले.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...