Wednesday, 5 May 2021

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार बंधु भगिनींसाठी लसीकरणाची विशेष सोय करावी ! 'राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव केतन भोज' यांची जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे मागणी.

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार बंधु भगिनींसाठी लसीकरणाची विशेष सोय करावी !

'राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव केतन भोज' यांची जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे मागणी.


रत्नागिरी, (प्रतिनिधी) ; अनेक पत्रकार पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रस्त्यावर उतरून वार्तांकनाचे काम निर्भीडपणे करत आहेत. अशा पत्रकारांमुळेच वास्तव बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचतात. रस्त्यावर उतरून काम करणारे पत्रकार, कॅमेरामन हे कोरोना योद्धेच आहेत. या कोरोनाच्या महामारीत अनेक पत्रकारांनी कोविड मुळे प्राण गमावले आहेत. तसेच अनेक पत्रकारांचे कुटुंबीय बाधित होऊन त्यांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. या कोरोना योद्ध्यांना कोणतेही विशेष सहकार्य सरकारकडून या काळात झाले नाही. सध्या १८ वर्षे पेक्षा जास्त आणि ४५ वर्षे पेक्षा जास्त लोकांना लसीकरण करणे रत्नागिरी जिल्ह्यात अवघड झाले आहे. ऑनलाईन मध्ये लस नोंदणी काही सेकंदात पूर्ण होते. अशा वेळी या पत्रकारांना लस घेणे अवघड झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांना आणि कुटुंबियांना सुद्धा लसीकरणासाठी दोन-तीन दिवसांची वेगळी नोंदणी ठेवावी. जेणेकरून रस्त्यावर उतरून काम करणारे पत्रकार सुरक्षित राहतील. इतर काही राज्यांनी सुद्धा पत्रकारांना कोरोना योद्धे म्हणून अशी विशेष सुविधा दिली आहे. या गोष्टीची जिल्हा प्रशासनाला भोज यांनी जाणीव करून देत अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव केतन भोज यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...