रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र यंत्रणा उभारावी - केतन भोज
रत्नागिरी, (प्रतिनिधी) ; दिव्यांग व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती सामान्य व्यक्तींच्या तुलनेत कमी असल्याने त्यांना कोरोना विषाणूचा धोका अधिक आहे.ही बाब लक्षात घेता, रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र कोरोना लसीकरण केंद्र उभारणे गरजेचे आहे.जेणेकरून दिव्यांग व्यक्तींना लस घेणे सोयीस्कर होईल आणि त्याठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.याशिवाय दिव्यांग व्यक्तींसाठी कोरोना लस घेण्याकरिता जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोफत वाहनाची सुविधा सुरू करावी. दिव्यांग व्यक्तींसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने एक स्वतंत्र हेल्पलाईन सेवा सुरू करावी. जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवनार नाही. आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण करण्यास सोयीस्कर होईल.अशी मागणी आर.आर.पाटील फाऊंडेशनचे केतन भोज यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment