राज्यात आज पुन्हा नवीन कोरोनाबाधीत रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त !
"चिंतेची बाब मृत्यू झालेल्यांची संख्या वाढली"
मुंबई : महाराष्ट्रातील कोरनाचा कहर आता कमी होताना दिसत आहे. आज राज्यात 51 हजार 800 नवे कोरोना बाधित समोर आले. तर सोमवारी 50 हजारपेक्षाही कमी कोरोनाबाधित समोर आले होते. मात्र, असे असले, तरी गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 891 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही चिंतेची बाब आहे.
आज समोर आलेल्या नव्या कोरोना बाधितांनंतर आता राज्यातील एकूण सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 6 लाख 41 हजार 910 एवढी झाली आहे. तर राज्यात आतापर्यंत एकूण 71 हजार 742 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच बरोबर गेल्या 24 तासांत 65 हजार 934 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
No comments:
Post a Comment