बारवी डॅम परिसर कोरडा ठक्क, वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे धूम !
कल्याण, (संजय कांबळे) : मुरबाड बदलापूर रस्त्यावर असलेल्या बारवी डॅम परिसर कडक उन्हाळ्यामुळे कोरडा ठक्क पडला आहे. तर पानगळ वनस्पती आणि पाणवसाठ्यांचा अभाव यामुळे वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे धूम सुरू असून अनेक पशूपक्षी पाण्याअभावी मृत्यूमुखी पडत आहे.
कल्याण तालुक्यातील खडवली, उशीद पळसोली, काकडपाडा, रुंदा फळेगाव, बापसई, बेलकरपाडा, मामणोली, तर शेजारच्या शहापूर, मुरबाड तालुक्यातील पोटगाव, बारवी डॅम परिसर, बदलापूर, कर्जत आदी भागांत जंगल व्यात परिसर आहे या जंगलात मोर, पोपट इतर पक्षी तसेच तरस, काळवीट, निलगाय, ससे, डुकर, सरपटणारे प्राणी, काही ठिकाणी चिते असे प्राणी आहेत. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत. जंगलातील वनराई बंधारे, व तलाव कधीच कोरडे पडले आहेत. उल्हास, बारवी, काळू नदी चे पात्र सोडले तर कुठेही पाणी नाही. अशातच काही महाभागांनी जंगलात वनवा लावल्याने थोडेफार हिरवे गवत व झाडे करपून गेली. त्यातच पानगळ सुरू असल्याने सर्व झाडांचा सांगाडा, साफळा दिसत आहे. झाडावर एकही पान नाही. त्यामुळे गार सावलीत बसून आराम करणारे पशुपक्षी व प्राणी कुठेही जंगलात दिसत नाही. त्यामुळे चारापाणी व शिकार यांच्या शोधात हे प्राणी मानवी वस्तीकडे येतात. यातून अनेक प्राण्यांचा जीव जातो सध्या बारवी डॅम परिसर कोरडा ठक्क पडला आहे. त्यामुळे पशुपक्षी व प्राण्यांची बैचेनी वाढली आहे. मोर, ससे, डुकर असे प्राणी शेतकऱ्यांच्या भाजीपाला शेतात सर्रास दिसून येत आहेत.
कल्याण, मुरबाड, सह अनेक शहरांमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या नदीला जिंवत ठेवणा-या औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी डॅम मध्ये सध्या 3८ टक्के पाणी साठा असून तो १३० दिवस पुरेल इतका आहे तसेच इरिगेशन डिपार्टमेंट च्या मागणीनुसार आपण नदीच्या पात्रात सरासरी १००० डिएम एल टी इतके पाणी सोडतो असे बारवी डॅम चे अधिकारी जनार्दन कुंभारे यांनी सांगितले.
त्यामुळे अशा आग ओकणाऱ्या कडक उन्हाळ्यात नागरिक, शेतकरी, पक्षीमित्र, पशुप्रेमी यांनी या परिसरात जास्तीतजास्त पानवटे निर्माण करायला हवे. कारण हे वाचले तर निसर्गाचा समतोल राखला जाईल व जंगल राहिले तर नैसर्गिक आॅक्शिजन मिळेल याचा विचार करायला हवा.
No comments:
Post a Comment