मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्टचे विश्वस्त डॉ. मनोज चव्हाण, न्यू इंग्लिश स्कूल १९८४ बँच व मनसे यांच्या वतीने औषधे, फेसशील्ड, पी.पी.ई किटचे वाटप !
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर/ समीर खाडिलकर) :
सन्मा.मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्टचे विश्वस्त डॉ. मनोज चव्हाण, न्यू इंग्लिश स्कूल १९८४ बँच व मनसे यांच्या वतीने कोकणातील ग्रामीण भागात कोविड विषाणू विरुद्ध ब्रेक दि चेन अंतर्गत लढा देण्यासाठी लागणारी औषधे, फेस शील्ड आणि पी.पी.ई किट चा पूर्ण संच संगमेश्वर येथील देवरूख पंचायत समिती कार्यालयात प्रमुख डॉक्टर सोनवणे मॅडम यांना सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष सान्वीताई संसारे, श्री.सागर संसारे, श्री.संदीप परब, श्री.अनुराग कोचरेकर व इतर मंडळी उपस्थित होते. अनेकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
No comments:
Post a Comment